अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रा. शाळा चेनापुर अव्वल , यंदाही मुलींनीच मारली बाजी..
अर्धापूर -तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेनापुर केंद्र लोणी (बु) च्या विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्नाच्या जोरावर घवघवीत यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे एकूण 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेनापुर येथील कु. संघमित्रा साहेबराव हाटकर ,कु. मंजुषा शंकर माहागाडे, कु. पृथ्वी तुळशीराम सावतकर, कु. शरयु केरबा पांचाळ, कु. संजीवनी बालाजी लोणे, हे विद्यार्थी एन.एम.एम.एस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत
या यशाबद्दल अर्धापूर गटशिक्षणाधिकारी गोडबोले सर ,शिक्षण विस्तार अधिकारी निजाम शेख सर, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन सोनटक्के सर, केंद्रप्रमुख आनंदराव मुदखेडे सर, विनोद देशमुख सर, विकास चव्हाण सर यांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले..!
• अर्धापूर तालुक्यातील एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा निकाल• अर्धापूर तालुक्यात एकूण 17 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेत
* १) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेनापुर – ५ विद्यार्थी
* २) शारदा भवन अर्धापूर – ५ विद्यार्थी
* ३) जिल्हा परिषद हायस्कूल लहान – २ विद्यार्थी
* ४) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी : १ विद्यार्थी
* ५) जिल्हा परिषद हायस्कूल येळेगाव – १ विद्यार्थी
* ६) सरस्वती विद्यालय मालेगाव – १ विद्यार्थी
* ७) मीनाक्षी हायस्कूल अर्धापूर – १ विद्यार्थी
* ८) छत्रपती शिवाजी हायस्कूल – शेलगाव १ विद्यार्थी