नांदेड (प्रतिनिधी)-शिवमंदिर जवळील महावितरणच्या डीपीला दुपारी 3 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन घेतली. तोपर्यंत भंगारात ठेवलेल्या चार दुचाकींना आग लागली. या आगीत चारही दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच श्याम नगर येथील रुग्णालयातील महावितरणच्या बोर्डाला दुपारी 3.40 च्या सुमारास आग लागली. त्वरित आग विझविण्यात आली. त्यामुळे नुकसान झाले नाही.