काल गुढीपाडवा साजरा झाला आणि आज रमजान ईद साजरी झाली. हिंदु-आणि मुस्लिम धर्मातील हे दोन अत्यंत महत्वाचे सण आहेत. या दोन दिवसांच्या आदल्या रात्री दोन महत्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यातील एक बीड जिल्ह्यात घडली आणि दुसरी जयपुर जिल्ह्यातील सांगानेर तालुक्यात घडली. या दोन ठिकाण घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींची नावे समोर आली तेंव्हा सर्वांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आहे. एखादा मुस्लीम समाजातील आरोपी असता तर त्या संदर्भाचा ढोल, नगारे वाजवून या सणांच्या दिवशी सुध्दा प्रचार झाला असता. पण भारतातील गंगा, जमुना संस्कृतीप्रमाणे जगणारे हिंदु-मुुस्लीम मात्र आपल्या जीवनाचा गाडा पुढे ढकलत आहेत.
पहिल्या घटनेमध्ये 30 मार्चच्या रात्री 2.30 वाजता अर्थात 30 मार्चची पहाट होण्याअगोदर अर्धमस्सा ता.गेवराई जि.बीड या ठिकाणी मस्जिदमध्ये बॉम्ब स्फोट झाला. हा बॉम्ब जिलेटीनच्या काड्यांनी तयार करण्यात आला होता. आवाज येतात गावातील सर्व हिंदु-मुुस्लीम आणि इतर धर्मिय एकत्र झाले. आपल्या तणावाचे वातावरण जरुर होते. परंतू अर्धमस्साचे सरपंच यांनी सकाळी 4 वाजता घडलेला प्रकार गेवराई पोलीसांना सांगितला आणि पोलीस लगेच तेथे पोहचले. कारण घटनापण गंभीरच होती. त्याच दिवशी सामाजिक संकेतस्थळावर एक युवक जिलेटीन काड्यांचा बॉम्ब हातात घेवून दाखवतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी तो युवक सिगरेट सुध्दा पित होता. पोलीसांनी अत्यंत त्वरीत प्रभावाने त्या युवकाचा शोध लावला त्याचे नाव विजय राम गव्हाणे (22) असे होते. त्या एकट्याने हे काम केले नव्हते. त्याच्यासोबत दुसरा होता. त्याचे नाव श्रीराम अशोक तागडे(21) असे आहे. 30 मार्चची पहाट झाली तेंव्हा घडलेल्या या घटनेबाबत पत्रकारांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असतांना त्यांनी सांगितले मला घडलेला प्रकार माहित आहे. बीड पोलीसांनी आरोपी अटक केले आहेत आणि त् या ठिकाणी शांतता आहे. काही दिवसांपुर्वी नागपुरमध्ये दंगल घडली होती. या दंगलीच्या आरोपींच्या नावासह देवेंद्र फडणवीस बोलले होते. आता बीड प्रकरणातील आरोपींची नावे का घेतली नाहीत याचा विचार वाचकांनी करावा. मस्साजोग या गावाच्या नावाने बीड जिल्हा अगोदरच चर्चेत आहे. काही मोठी समाज कार्य घडल्याची घटना तेथे घडली नाही. मस्साजोगमध्ये झालेल्या सरपंचाच्या हत्यमुळे संपुर्ण बीड जिल्हा चर्चेत आला आहे. अर्धमस्सा गावातील मस्जिदच्या शेजारीच सय्यद बादशाहचा दर्गा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संपुर्ण गाव या दर्गाजवळच जमते आणि गावातील सर्व धर्मिय लोक या ठिकाणी गुढीपाडवा साजरा करतात. मस्जीदमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर जीवत हानी झाली नाही. पण मस्जीदला थोडेफार नुकसान झाले आहे. अर्धमस्सा गावातील सर्व धर्मियांनी मिळून या मस्जीदीची दुरूस्ती करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कोणाकडून पैसे मागितले जाणार नाहीत. सर्व पैसे अर्धामस्सा गावातील हिंदु-मुस्लीम आणि इतर धर्मिय मिळून ते करणार आहेत. काय लिहावे या निर्णयावर. त्याबाबत वाचकांनी आम्हाला कळवावे.
राजस्थानच्या जयपुर जिल्ह्यामध्ये सांगानेर या तालुक्यातील शहरात प्रतापनगर आहे. त्या ठिकाणी भगवान तेजाजी यांचे मंदिर आहे. 30 मार्चच्या रात्रीच या मंदिरमधील मुर्तीला खंडीत करण्याचा प्रकार घडला. ज्यांना याचा राग आला. त्यांनी जयपुर-टोंक हा महामार्ग बंद केला, टायर जाळले, दुकाने बंद केली. पण पोलीसांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर तेजाजी मंदिरातील मुर्ती खंडीत करणारा गुन्हेगार काही तासातच पकडला. त्याचे नाव सिध्दार्थसिंह असे आहे. या सिध्दार्थसिंहचे नाव कळल्याबरोबर अक्राळ-विक्राळ अवस्थेत ओरड करणारे गायब झाले. यानंतर पोलीसांनी या घटनेची माहिती प्रसारीत केली तेंव्हा सांगितले की, घडलेल्या घटनेच्या संबंधाने सांगानेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा करणाऱ्या सिध्दार्थसिंहचा सांगानेरमधील राजा पार्क या भागात कॅफे आहे. त्या दिवशी इन्टर कॉन्टीनेटल या हॉटेलमध्ये आपल्या मित्राला भेटून परत तो घरी जात असतांना रस्त्यात फिरणाऱ्या कुत्रांसोबत बराच वेळ खेळला. आणि त्यानंतर प्रतापनगरमधील देजाजी देवाच्या मंदिरात गेला आणि देवाशी भांडू लागला. माझ्या जीवनाचा तु सत्यानाश केलास आणि या रागातून त्याने मुर्ती खंडीत केली. थोडक्यात पोलीसांच्या बोलण्याचा अर्थक असा आहे की, तो मनोविकार रुग्ण आहे. सध्या त्याला अटक झाली आहे. कार्यवाही सुरू आहे.
काही वर्षांपुर्वी ऍग्री यंग मॅन अमिताभ बच्च यांचा दिवार नावाचा चित्रपट आला होता. त्यामध्ये अमिताश बच्चन सुध्दा देवाशी भांडतात. त्या चित्रपटाच्या निर्देशकांनी अमिताभ बच्चनला कोणताही डॉयलॉग दिला नव्हता तु देवाशी भांड, तुझे जे काही शब्द निघतील तेच आपण डॉयलॉग म्हणून वापरू असे सांगितले. त्या भांडणाची सुरूवात अमिताभ बच्च न्यांनी आज तो बहुत कुश होेंगे तुम अशा शब्दात केली होती. आणि त्यांचेच ते शब्द चित्रपटात आहेत. त्या ठिकाणी अमिताभ बच्च न्यांनी मुर्ती खंडीत केली नव्हती. भगवान जगनाथ 9दिवसासाठी आपल्या आत्याच्या घश्री जातात. ती रथयात्रा पहाण्यासाठी जगभरातून लाखो भाविक दरवर्षी येतात. बल भद्र, सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ असे तिन रथ तेथून निघतात. पण ते रथ ओढल्या जात नाहीत. त् यावेळी ओढणारी मंडळी भगवंताला शिव्या द ेत असते. लवकर जा आत्याच्या घरी यासाठी. पण ते तोडफोड करत नाहीत. भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या हातात घेतलेल्या कवि, विचारवंत कुमार विश्र्वास यांनी सैफअली खानच्या कुटूंबाला वेठीला धरल्याचे वाचकांना आठवत असेल. त्यात सैफ अली खानने आपल्या मुलाचे नाव तैमुर असे ठेवले. हे त्याचे कारण आहे. वाचकांच्या सोयीसाठी आम्ही तैमुर या शब्दाचा अर्थ देत आहोत तो अर्थ म्हणजे विश्र्वविजेता. जर या शब्दाला विचार करू तर सैफअली खानचे काय चुकले. पण एक तैमुर आक्रांता होता. पण एक आक्रांता असेल म्हणजे सर्वच तैमुर असे असतात काय? नावामध्ये काय पडले आहे अनेक सुनयनांचे डोळे त्रिरळे असतात आणि अनेक अशोकांच्या जीवनात शोक जास्त असतो. अर्धमस्सामध्ये गुन्हा करणाऱ्या दोघांच्या नावात राम हा शब्द आहे. म्हणजे नाव रामाचे आणि काम रावणाचे झाले. असे म्हणावे काय की अर्धमस्सा आणि सांगानेर मध्ये घडलेल्या घटना सुनियिोजित पध्दतीने दोन जणांच्या पुर्वी तयार करण्यात आलेला दंगे भडकावण्याचा आलेख होता काय? पण दोन्ही ठिकाणी हिंदु-मुस्लिम समाजाने आम्ही वेगळे नाहीत हे दाखवून दिले आहे.
गुढीपाडव्याचा सुर्योदय होण्याअगोदर अर्धमस्या गावात घडलेला प्रकार आणि राजस्थानच्या सांगानेरमध्ये घडलेला प्रकार कशाचे द्योतक आहे
