नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरापासून जवळ असलेल्या पासदगाव येथे शाळेच्या मुख्याध्यापकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार आज घडला आहे. या मागचे कारणे काय आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.
पासदगाव ता.जि.नांदेड येथे पुष्पांजली माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेचे मुख्याध्यापक सुनिल भानुदासराव कारामुंगे (48) हे आहे. आज त्यांनी शाळेतच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शिक्षकाने आपल्या मृत्यू संदर्भाने मृत्यूपत्र लिहुन ठेवले आहे. या संदर्भाचा शोध झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही होईल. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
शिक्षकाने शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली
