शहाजी उमापांनी सुरू केलेली पोलीस चौकी रात्री 7-8 वाजताच बंद होते

नांदेड(प्रतिनिधी)-जनतेच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सांगवी परिसरात एक नुतन पोलीस चौकीचे उद्‌घाटन 20 मार्च रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केेले. ज्या कारणांसाठी ती चौकी सुरू करण्यात आली. ती कारणे रात्रीच्या वेळेतील किंवा सकाळच्या मॉर्निंग वॉकच्या वेळेतील आहेत. पण दि.23 आणि 24 मार्च रोजी या चौकशीची पाहणी केली असता सायंकाळी 7 वाजता आणि रात्री 8 वाजता ही चौकी बंद दिसली. मग कशासाठी ही पोलीस चौकी तयार झाली हा प्रश्न नक्कीच महत्वपुर्ण आहे.
पोलीस विभागाकडे विशेष करून पोलीस उपमहानिरिक्षकांकडे नांदेडच्या अनेेक नागरीकांनी तक्रारी केल्या की, सांगवी परिसरातील रेल्वे विभागीय कार्यालयासमोरील रस्ता हा अत्यंत धोकादायक आहे. हा रस्ता सुर्यास्तानंतर निर्मनुष्य होतो. पहाटे सुर्योदयापुर्वी सुध्दा निर्मनुष्य असतो. परंतू पहाटे काही लोक मॉर्निंक वाक करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. रात्रीच्यावेळी अत्यंत सुरक्षीत जागा चुकीचे काम करणाऱ्यांसाठी हीच आहे. त्यात दारु पिणे, अशी काही कामे करणे ज्याबद्दली आम्ही आमच्या लेखणीचा वापर करू इच्छीत नाही. कारण ती कारणे लिहुन आम्ही समाजात काय चालते हे दाखविण्याचा हा प्रयत्न नाही. पण ती कामे चुकीचीच असतात आणि या सर्व बाबींवर जरब बसावी अशा तक्रारीनंतर सांगवी परिसरात पोलीस चौकी तयार करण्याचा निर्णय झाला.
20 मार्च 2025 रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी या चौकीचे उद्‌घाटन केले. त्यावेळी जनतेतील अनेक नागरीकांनी शहाजी उमापसह पोलीस विभागाला धन्यवाद दिले. कारण या भागात येणाऱ्या अडचणी महत्वपुर्ण होत्या आणि त्या अडचणी यापुढे दुर होणार होत्या. दि.23 मार्च 2025 रोजी रात्री 8 वाजता ही पोलीस चौकी कुलूप लावून बंद करण्यात आली होती. तसेच दुसऱ्या दिवशी 24 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 वाजताच ही पोलीस चौकी बंद करण्यात आलेली होती. हे पाहुन नक्कीच असे म्हणावे लागेल की, का सुरू केली होती ही पोलीस चौकी, कारण सुर्यास्तानंतरच या भागात पोलीसांचा वावर आवश्यक आहे आणि चौकीच बंद तर पोलीसांचा वावर कसा दिसेल. परंतू जनतेच्या तक्ररारीकडे फक्त चौकीचे उद्‌घाटन करून लक्ष देता येत नाही. त्यासाठी ती पोलीस चौकी कायम सुरू राहावी लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!