रुक्म्या डाकू आणि मोगलीच्या खेळाने एक वृत्तप्रतिनिधी त्रासात

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात पत्रकार क्षेत्रातील वृत्तवाहिन्यांमध्ये एकेकाळी आपले वर्चस्व गाजवणाऱ्या रुक्म्या डाकूने आपली वाट लागताच एका काकाला आणि मोगलीला हाताशी धरुन इतरांची वाट लावण्याचा एक नवीन धंदा सुरू केला आहे. हा धंदा रुक्म्या डाकूला मात्र नवीन संधी देईल की नाही हे नाही सांगता येणार.परंतू आज असलेले त्याचे काम सुध्दा जाण्याची पाळी नक्कीच एका दिवशी येईल असे बोलले जात आहे. कारण आपण दुसऱ्या कोणासाठी खड्डा खोदतो तेंव्हा त्या खड्यात आपण सुध्दा पडत असतो हा वाक प्रचार आम्ही तयार केलेला नाही.
काल-परवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेडला आले होते. त्यात एका वृत्तवाहिनीचा पत्रकार हजर होता. परंतू रुक्म्या डाकू आणि मोगलीने मिळून त्या ठिकाणी असलेल्या रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून त्या वृत्तवाहिनीला प्रतिनिधी नसतांना सुध्दा बातमी पाठविली. त्या बातमीचा मतीतार्थ असा होता की, अजित पवारांच्या सभेकडे लोकांनी फिरवली पाठ.यातून रुक्म्या डाकूला आणि मोगलीला काय साध्य करायचे आहे? त्या सभेच्या आयोजकांना अडचणीत आणयचे होते किंवा वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची वाट लावायची होती. यात दोन्ही बाजू खऱ्याच आहेत. वृत्तवाहिनीने रुक्म्या डाकू आणि मोगलीने पाठविलेल्या बातमीची दखल घेत ते बातमी प्रसारीत केली आणि आपल्या प्रतिनिधीकडून राजीनामा घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. रुक्म्या डाकू ज्या वृत्त संस्थेत आज काम करतो त्या संस्थेत सुध्दा ती बातमी लागली नाही. तसेच मोगलीच्या वृत्त संस्थेतही ती बातमी लागली नाही. काय अर्थ घ्यावा याचा. हा वाचकांचा विषय आहे. या बातमीमुळे सभा आयोजकांना सुध्दा आपल्या बोटांच्या इशारावर नाचविण्याचा सुध्दा प्रकार असू शकतो. कारण आम्हीच हे सर्व खेळ केला असे दाखवून आयोजकांकडून भविष्यात माया जमा करण्याचा हा प्रकार असेल. याला सुध्दा नाकारता येणार नाही.
रुक्म्या डाकू आणि मोगली नागपूरी काकाच्या मार्गदर्शनात करत असलेले धंदे आता लपून राहिलेले नाहीत. काय साध्य होते या खेळामध्ये एखादा युवक आपल्या मेहनतीने पुढे आला असेल तर त्याचे दु:ख रुक्म्या डाकू, मोगली किंवा नागपूरी काका यांना होण्याचे काही कारण नाही. म्हणूच म्हणतात आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही आणि इतरांच्या डोळ्यातील कुसळ शोधण्यात मग्न असणाऱ्या लोकांना जीवनात काही साध्यच होत नसते. मोगली सुध्दा बिअर बारमध्ये जावून पेप्सी पितो म्हणे. कोण विश्र्वास करेल यावर. एखाद्या दु:खावलेल्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून पेप्सी पिण्याचे व्हिडीओ त्याच्या वृृत्तसंस्थेला पाठविले तर वृत्त संस्था मोगलीचे काय हाल करेल. रुक्म्या डाकूच्या कथा तर एवढ्या आहेत की, बेरक्याला दिल्या तर तो सुध्दा आपल्या तोंडात बोट टाकेल आणि मी चुकीच्या माणसावर विश्र्वास केला याचे दु:ख बेरक्याला होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!