नांदेड(प्रतिनिधी)-बेलानगर नांदेड येथील एका 41 वर्षीय व्यक्तीने दुचाकी गाड्या चोरी केल्या आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या 6 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या संदर्भाने दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, विठ्ठल घागरे, पोलीस उपनिरिक्षक बळीराम दासरे, पोलीस अंमलदार पावडे, वैद्य, इजराईल, बिरादार, कदम, सुरेश घुगे, मिलिंद नरबाग, संजीव जिंकलवाड, बालाजी यादगिरवाड, सोनसळे, राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांनी 10 मार्च रोजी बेलानगर भागातील रमेश शामराव कयापाक (41) यास ताब्यात घेतले. त्याने चोरलेल्या 6 दुचाकी गाड्या 2 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत. रमेश कयापाकने शिवाजीनगर, वजिराबाद आणि भोकर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून केलेल्या तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याकडून सहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या
