दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे गंठण तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण दोन अनोळखी चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार मनगपुरा भागात घडला आहे.
सुप्रिया सुरेश सुरोशे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास त्या आपल्या दुचाकीवर जात असतांना मगनपुरा भागातील भाटीया कॉम्प्लेक्सजवळ दोन अनोळखी लोकांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण 1 लाख रुपये किंमतीचे बळजबरीने तोडून नेले आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 87/2025 प्रमाणे दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक कदम हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!