एम.जे.च्या खून प्रकरणात कट रचण्याच्या आरोपात नवनाथ वाकोडेला अटक; पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-अमोल भुजबळे उर्फ एम.जे. याचा खून करण्याच्या प्रकारात एका आरोपीच वाढ झाली आहे. या प्रकरणातील नवीन आरोपी नवनाथ वाकोडे यासह न्यायालयात दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.26 फेबु्रवारी रोजी अमोल चांदु भुजबळे (32) या युवकाचा खून झाला. या प्रकरणात ढोकी ता.जि.नांदेड येथील गोपाळ निवृत्ती वाकोडे (29) निखील भगवान वाकोडे (19) या दोघांना अटक झाली होती. सध्या त्या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात झाली आहे. एम.जे.च्या आईने या प्रकरणातील कटकारस्थान नवनाथ वाकोडे यांनी केले आहे असा आरोप केला होता. त्यानुसार शिवाजीनगर पोलीसांनी नवनाथ बन्सी वाकोडे (27) यास 5 मार्च रोजी अटक केली. या प्रकरणाचा एफआयआर लिहिला तेंव्हा नवनाथ बन्सी वाकोडे, सतिश बन्सी वाकोडे, भगवान सखाराम वाकोडे, निवृत्ती सखाराम वाकोडे, भगवानचा मुलगा, बन्सी वाकोडे, बन्सीचा भाऊ या लोकांवर सुध्दा संशय असल्याचे लिहिलेले आहे.
आज पोलीस निरिक्षक शिवाजी गुरमे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवनाथ बन्सी वाकोडेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करतांना नवनाथ बन्सी वाकोडे यांच्यासोबत खून करणाऱ्या दोन आरोपींचा काय संशय आहे. याबाबत तपास करायचा आहे असे सांगितले. नवनाथ वाकोडेच्यावतीने ऍड. सय्यद मुजाहिद यांनी या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज प्रमाणे मारेकरी दोनच असतांना नवनाथ वाकोडेची अटक अयोग्य असल्याचे सांगितले. तसेच घटनेच्यावतीने नवनाथ वाकोडे हे कोठे होता हे शोधण्याची गरज आहे. युक्तीवा ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नवनाथ वाकोडेला दोन दिवस अर्थात 8 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!