उमरज देवस्थानात महिलांचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे उमरज ता.लोहा येथे मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या काही महिलांचे दागिणे चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार 4 मार्च 2025 रोजी घडला आहे. यात 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
दापकाराजा ता.मुखेड येथील सुनिता माधव सरकाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे उमरज येथे मारोती मंदिरात देवकीनंदन ठाकूर यांचे भागवत प्रवचन 4 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. मी आणि माझे साथीदार भागवत पुराण ऐकून दुपारी 3 वाजता भगवान हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये थांबलो असता 16 ग्रॅम वजनाचे 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबले आहे. या प्रकरणी माळाकोळी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 32/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कलेवार अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!