नांदेड(प्रतिनिधी)-26 फेबु्रवारी रोजी सकाळी 7 वाजता अमोल चांदु भुजबळे(35) या युवकाचा खून झाला. या प्रकरणात आलेल्या पोलीस प्राथमिकीप्रमाणे दोन मारेकरी सध्या पोलीस कोठडीत आहेत. आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ऍड.गोरक्ष लोखंडे यांना अमोल भुजबळे उर्फ एम.जे.च्या आई आणि पत्नी या भेटायला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, माझ्या पोराला मारणाऱ्या लोकांमध्ये कटाच्या सहभागात नवनाथ वाकोडे हा आहे. त्याला मात्र अद्याप अटक झाली नसल्याचे दु:ख व्यक्त केले.
26 फेबु्रवारी रोजी अमोल चांदु भुजबळे उर्फ एम.जे. या युवकाचा खून झाला होता. या संदर्भाची पार्श्र्वभूमी माहिती प्राप्त केली असता ढोकी ता.जि.नांदेड या गावातील रहिवासी चांदु भुजबळे कुटूंबिय आणि वाकोडे कुटूंबिय आहेत. मागे काही दिवसांपुर्वी वाकोडे कुटूंबिय आणि एम.जे.मध्ये झालेल्या भांडणात संदर्भाने पोलीस ठाणे लिंबगाव येथे गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर या प्रकरणाला जास्त हवा मिळाली आणि कोणी तरी एक संपेल अशी भुमिका दोन्ही गटांनी घेतली. 26 फेबु्रवारी रोजी दोन जणांनी एम.जे.वर हल्ला केला.हल्ला झाल्यानंतर सुध्दा मोठ्या हिम्मतीने एम.जेे.ने त्यांना विरोध केला. त्यातील एका युवकाच्या हातातील चाकू ओढून त्याच्याच डोक्यात एम.जे.मारले होते. पण त्या मारहाणी एम.जे.चा मृत्यू झाला.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गोपाळ निवृत्ती वाकोडे आणि निखिल भगवान वाकोडे या दोघांना अटक केली. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. आज एम.जे.च्या आई शिलाबाई चांदु भुजबळे, एम.जे.च्या पत्नी पौर्णिमा अमोल भुजबळे हे दोघे एम.जे.च्या दोन लहान बालकांना घेवून ऍड.गोरक्ष लोखंडे यांना भेटले. त्यानंतर वास्तव न्युज लाईव्हला त्या दोघी सांगत होत्या की, अमोल भुजबळेचा खून करण्याच्या कटात नवनाथ वाकोडेचा हात आहेच. पण त्याला अद्याप अटक झालेली नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही गोरक्ष लोखंडे ची भेट घेतली असून त्यांना या संदर्भाने आमची विनंती सादर केली आहे. आपल्या मुलाचा मृत्यू आईच्या डोळ्यातून अश्रुंच्या रुपाने आम्ही प्रत्यक्ष पाहिला असतांना आमच्या अंगाला काटा आला होता.
एम.जे.खून प्रकरणात मुख्य सुत्रधार नवनाथ वाकोडे-एम.जे.च्या आईचे वक्तव्य
