नांदेड(प्रतिनिधी)-गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षकांना दखल द्यावी लागत आहे. असाच एक प्रकार मुदखेड पोलीस ठाण्यात घडला. 9 फेबु्रवारी रोजी घडलेल्या घटनेचा गुन्हा 25 फेबु्रवारी रोजी दाखल झाला आहे. पण ती तक्रार लिहुन घेतांना मी रुग्णालयात जाऊन उपचार घेतला आणि आज माझी प्रकृती बरी झाल्याने मी तक्रार देत आहे असे वाक्य लिहिले आहे. याचे विश्लेषण करण्याऐवजी वाचक स्वत: समजून घेतली.
दत्ता संतोबा आनेराव यांनी पोलीस ठाणे मुदखेड येथे दिलेल्या तक्रारीनुसार ते रोहिपिंपळगाव ता.मुदखेड येथील रहिवासी आहेत. ते शेतकरी आहेत. गट क्रमांक 137 मध्ये माझा भाऊ संभाजी संतोबा आनेराव हे बळजबरीने रस्ता तयार करुन वापरत आहेत. संभाजी आनेरावने तहसील कार्यालय मुदखेड येथे रस्त्याबाबत याचिका दाखल केली. त्यात 10 जानेवारी 2025 रोजी निर्णय झाला. त्या निर्णयानुसार संभाजी संतोबा आनेराव वापरत असलेला रस्ता हा माझ्या शेत जमीनीचा भाग आहे असे त्या निकालात नमुद आहे. त्याप्रमाणे 6 फेबु्रवारी रोजी आणि 8 फेबु्रवारी रोजी तो रस्ता काढून टाकण्यासाठी मी जेसीबी आणली असतांना भाऊ संभाजी, त्यांची पत्नी पार्वती यांनी मला तो रस्ता उखडू दिला नाही. 9 फेबु्रवारी रोजी मी शेताला पाणी देण्यासाठी गेलो असतांना माझा भाऊ संभाजी त्यांची पत्नी पार्वतीबाई, मुलगी यशोदा दत्ता लोसरे व संदीप धोंडीबा होळगे यांच्यासह 3 पुरूष आणि 2 महिला तोंड बांधून बसले होते आणि आमच्या शेतात जाण्यासाठी का रस्ता देत नाही म्हणून माझ्या सोबत वाद घातला. दगडांनी, लाथाबुक्यांनी मला मारुन दु:खापत करण्यात आली. मी कसा-बसा तेथून पळालो. त्यानंतर माझा भाऊ अंबादास आनेराव आणि गावातील व्यक्ती भानुदास यांना घडलेला प्रकार सांगितला. या पोलीस प्राथमिकीमध्ये सगळ्यात शेवटी लिहिलेले वाक्य असे आहे की, मी दि.10 फेबु्रवारी 2025 रोजी ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे जाऊन माझ्या मारावर उपचार घेतला व आज रोजी माझी प्रकृती ठिक झाल्याने तक्रार देत आहे असे लिहिले आहे. मुदखेड येथे पोलीस निरिक्षक या पदावर वसंत सप्रे हे कार्यरत आहेत.
मुदखेड पोलीसांनी या तक्रारीनुसार संभाजी आनेराव, पार्वतीबाई आनेराव, यशोदा दत्ता लोहसरे, संदीप धोंडीबा होळगे व इतर तीन पुरूष व दोन महिला अशा लोकांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(2), 191(2), 190, 118(1), 115(2), 351(3) आणि 352 नुसार गुन्हा क्रमांक 31/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास मुदखेडचे पोलीस निरिक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षकांचा हस्तक्षेप आवश्यक झाला आहे
