नांदेड(प्रतिनिधी)-काल दुबई येथे झालेल्या भारत-पाकिस्तान या क्रिकेट सामन्यासाठी डॉ.आंबेडकरनगर येथे राहुल भाऊ सोनसळे यांच्या मित्रांनी मोठ्या स्क्रीनची सोय करून नागरीकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. भारताचा या क्रिकेट सामन्यात विजय झाला आणि लोकांनी जल्लोष केला.
डॉ.आंबेडकरनगर येथे राहुल भाऊ सोनसळे, अविनाश गायकवाड, महेश पंडीत यांच्यासह अनेक युवकांनी नागरीकांसाठी भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची सोय करून दिली होती. सुरूवातीला पाकिस्तानचे पारडे जड होईल असे वाटत होते. परंतू भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला मोठे टार्गेट उभारू दिले नाही. त्यानंतर फलंदाजी करतांना भारताच्यावतीने सुरूवात चांगली झाली होती. परंतू कर्णधार रोहित शर्मा यांची एष्टी पाकिस्तान गोलंदाजांनी खाली पाडली. परंतू त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी 100 पेक्षा जास्त धावांची खेळी करून भारताच्या टार्गेटला आकार दिला. त्यानंतर श्रेयश आय्यर, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांच्या साथीने आपल्या धावांची मजल-दरमजल करत भारताने 7 षटके शिल्लक असतांना सामना जिंकला. या सामन्यात विराट कोहलीचे शतक होवू नये म्हणून पाकिस्तानच्या गोलंदाजांनी एष्टीच्या बाहेर गोलंदाजी केली. तरी पण शेवटचा चौकार मारून विराट कोहलीने आपले शतकही पुर्ण केले आणि भारताने सामना जिंकला. डॉ.आंबेडकरनगरमधील बालक,युवक , महिला व जेष्ठांनी या मोठ्या स्क्रीनवर भारत-पाकिस्तानचा सामना पाहुन आनंद व्यक्त केला आणि भारत विजयी झाल्यानंतर डॉ.आंबेडकरनगरमधील नागरीकांनी जल्लोष साजरा केला.
डॉ.आंबेडकरनगरमध्ये युवकांनी नागरीकांच्या सोयीसाठी भारत-पाकिस्तान सामना मोठ्या स्क्रीनवर दाखवला
