नांदेड,(प्रतिनिधी)-सिख एज्युकेशन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष जरनैलसिंघ भुंजगसिंघ गाडीवाले यांच्यावतीने आजोयित सिख युथ फेस्टीव्हल ची जय्यत तयारी.
सिख एज्युकेशन वेलफेअर असोसिएशन सेवा संस्थेच्यावतीने गेल्या दहा वर्षापासुन निरतंर पणे सिख युथ फेस्टीव्हल चे आयोजन केले जाते. हे आयोजन श्री गुरु गोंविदसिंघजी यांचे चार पुत्र (अर्थात) चार साहिबजादे यांनी मानवतेसाठी आणी अधर्माच्या विरोधात लढत असताना दिलेल्या बलिदानाच्या पावन स्मृतीमध्ये सिख युथ फेस्टीव्हलच्या नावाने कार्यक्रम पार पडतो. यंदाचा आयोजनाचा हे अकरावे वर्ष असुन १९ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान अशा दोन दिवशीय स्पर्धाचे आयोजनाचे खालसा हायस्कुल मैदानावर जय्यत तयारी केली होती अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक जरनैलसिंघ भुंजगसिंघ गाडीवाले यांनी दिली आहे. या कार्याक्रमाचा उद्याटन संमारभ १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या हस्ते संपन्न झाला.बक्षीस वितरण कार्यक्रम तारीख २० फेब्रुवारी २०२५ रोजी सांय ४.३० वा.संपन्न झाला. या क्रर्याक्रमाचे उद्याटन व बक्षीस संमारभात संत महापुरुष व विविध पक्षातील जेष्ठ नेते, अधिकारी मान्यवर, व जेष्ठ नागरीक यांच्या शुभ हस्ते झाले. या आयोजनामध्ये पगडी बांधणे, गुरुवाणी कंठ, हॉकी, व्हीलीबॉल, बॅटमिटन अश्याप्रकारे धार्मिक व खेळ स्पर्धा युवक व युवती साठी पार पडल्या. या कार्यक्रमाच्या स्थानाला दिवाण तोडरमल जैन असे नाव देण्यात येत आहे अशी माहिती गाडीवाले यांनी दिली आहे. तसेच या कार्यक्रमाला युवक व युवतीनी जास्ती जास्त संख्येने सहभाग नोंदवला होता,असे कार्यक्रमाचे आयोजक व संस्थेचे अध्यक्ष जरनैलसिंघ भुंजगसिंघ गाडीवाले यांनी सांगितले.
