नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा जवळ 10 फेबु्रवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात एटीएस पथकाने पंजाब येथून पकडून आणलेल्या एका 22 वर्षीय युवका 1 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत.
नांदेड येथे 10 फेबु्रवारी 2025 रोजी शहिदपुरा भागात दुचाकीवर जाणाऱ्या दोन युवकांवर गोळीबार झाला. त्यात दुचाकी चालविणारा रविंद्रसिंघ राठोड होता आणि त्याच्या पाठीमागे बसलेला गुरमितसिंघ सेवादार हा युवक होता. गुरमितसिंघ सेवादार याला कुख्यात अतिरेकी हरविंदरसिंघ उर्फ रिंधाचा भाऊ सत्येंद्रसिंघ उर्फ सत्या याचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तो कैदी असतांना पॅरोल रजेवर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आला होता. पॅरोल रजा 30 दिवसांची असते आणि 10 फेबु्रवारी रोजी त्याच्यावर एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. हा खून का बदला खून असा प्रकार आहे.
या प्रकरणात गुरमितला लागलेल्या गोळ्या त्याच्या शरिरातून आरपार झाल्या आणि गाडी चालविणाऱ्या रविंद्रसिंघला लागल्या. उपचारादरम्यान राजेंद्रसिंघचा मृत्यू झाला. त्या प्रकरणात वजिराबाद पोलीसांनी खून आणि जिवेघेणा हल्ला असा गुन्हा दाखल केला. वजिराबाद पोलीसांनी अज्ञात हल्लेखोरांना मदत करणारे मनप्रितसिंघ गुरूबक्षसिंघ ढिल्लो आणि हरप्रितसिंघ बाबूसिंघ कारपेंटर या दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोघांना 20 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविलेले आहे.
त्यानंतर हा तपास राज्याच्या एटीएस शाखेकडे वर्ग करण्यात आला आणि त्यात अनेक गंभीर कलमे वाढली. एटीएस पथकाने त्यांच्याकडे असलेल्या माहितीनुसार पंजाबकडे पाठविलेल्या पथकाने पंजाबमधून अर्शदिपसिंघ भजनसिंघ (22) या युवकाला पकडून आणले. प्राप्त माहितीनुसार त्याने अज्ञात हल्लेखोरला मदत केलेली आहे. आज नांदेड न्यायालयात विशेष न्यायालयाने अर्शदिपसिंघला 1 मार्च 2025 पर्यंत 14 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी..
10 फेबु्रवारीच्या गोळीबार प्रकरणात पंजाबहून पकडून आणलेल्या युवकाला 14 दिवस पोलीस कोठडी

One thought on “10 फेबु्रवारीच्या गोळीबार प्रकरणात पंजाबहून पकडून आणलेल्या युवकाला 14 दिवस पोलीस कोठडी”