नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचे 4 लाख 50 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मुखेड तालुक्यातील नंदगाव (प.क.) येथे एक घरफोडून चोरट्यांनी 58 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
पेवा ता.हदगाव येथील शेतकरी प्रताप प्रभाकर जाधव हे दि.17 फेबु्रवारी रोजी एसबीआय बॅंक शाखा हदगाव येथे शेती मालाचे आलेले 4 लाख 50 हजार रुपये थैलीमध्ये घेवून बॅंकेच्या रांगेत बसलेले होते. भरलेली बॅंकेची सिल्प चुकल्याने पैशांची थैली बसले होते तेथेच ठेवून दुसरी सिल्प घेण्यासाठी गेले एवढ्यातच कोणी तरी चोरट्यांनी ती 4 लाख 50 हजार रुपयांची बॅंग चोरून नेली. हदगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 37/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक रायबोळे अधिक तपास करीत आहेत.
छत्रपती उर्फ तिरुपती तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मौजे नंदगाव (प.क.) ता.मुखेड येथील त्यांचे बंद घरफोडून चोरट्यांनी डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 58 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 29/2025 प्रमाणे नोंदवली असून पोलीस अंमलदार तेलंगे अधिक तपास करीत आहेत.
बॅंकेतून शेतकऱ्याचे 4 लाख 50 हजार रुपये चोरले ; नंदगाव येथे घर फोडले
