महाकुंभ मेळ्यासाठी गेलेल्या नांदेडमधील चार भाविकांवर काळाचा घाला

नांदेड(प्रतिनिधी)- प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यावरून अयोध्येकडून परत निघत असतांना भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उभ्याा असणाऱ्या वाहनावर जोराची धडक बसून यात तीन जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती अपघात स्थळी असणाऱ्या भाविकाने दिली. तर अन्य तिघांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नांदेड येथून प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने 23 जण रवाना झाले होते. महाकुंभ मेळ्यात स्नान करून हे सर्व भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने अयोध्येकडून परत निघत असतांना रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हल्सवर भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर जावून धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर यातील एका महिलेचा ही घटना पाहताच हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने तिचाही मृत्यू झाल्याची माहिती सोबत असणाऱ्या एका भाविकाने दिली.
यामध्ये नांदेडमध्ये राहणाऱ्या सुनील दिगंबर वरपडे (वय 50), अनुसया दिगंबर वरपडे (वय 80) या आई आणि मुलाचा तर दीपक गणेश गोदले (वय 40) यांचा जाग्यावरच मृत्यू झाला आणि हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजेबुवा येथील जयश्री पुंडलिकराव चव्हाण (वय 50) या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती याच वाहनता असणाऱ्या गणेश गोदले या भाविकाने माहिती दिली. तर यातील तिन जणांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर उत्तर प्रदेश येथील गोसाईगंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचसोबत काही जणांना किरकोळ दु:खापत झाली असून प्राथमिक उपचार घेवून ते नांदेडकडे निघाले आहेत. यातील सर्वांचे मृतदेह दि.17 फेबु्रवारी रोज सोमवारी नांदेडमध्ये सकाळी 10 ते 11 वाजेच्यासुमारास दाखल होतील अशी देखील गणेश गोदले यांनी दिली. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!