नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्यातील इस्लामपूर, देगलूरनाका, लक्ष्मीनगर आदी परिसरांमधून इतवारा पोलीसांनी जवळपास 34 गोवंश पकडले आहेत. या गोवंशांची किंमत 10 लाख 51 हजार 500 रुपये आहे. यांची कत्तल होणार होती या परिस्थितीत या गोवंशांना जीवदान दिले आहे.
इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात इतवाराचे पोलीस निरिक्षक रजिंत भोईटे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, विलास पवार, पोलीस अंमलदार बेग, धर्माजी कस्तुरे, शेख वाजेद, गणेश कोंडेकर, बालाजी चंचलवाड, अर्जुन मुंडे, श्रीराम दासरे, शेख वाजिद, शेख गुलाम दुराणी यांनी शनिवार रात्रीपासून ते रविवारच्या पहाटेपर्यंत त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन ठिकाणातून 34 गोवंशांची सुटका केली. या गोवंशाची किंमत 10 लाख 51 हजार 500 रुपये आहे. या प्रकरणी चार जणांविरुध्द तिन स्वतंत्र गुन्हा सुध्दा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे शेख फहिम शेख सत्तार रा.इमरान कॉलनी देगलूर नाका, मोहम्मद जाकेर मोहम्मद फारुख रा.साईनगर इतवारा, मोहम्मद अरबाज मोहम्मद युसूफ रा.इमरान कॉलनी देगलूर नाका आणि मोहम्मद निसार आणि मोहम्मद इस्माईल रा.खयुम प्लॉट नांदेड अशी आहेत. या गोवंशांना कत्तलीसाठी बांधून ठेवले होते अशी चर्चा होत आहे.
इतवारा पोलीसांनी 10 लाख 51 हजार 500 रुपयांचे 34 गोवंश पकडले
