नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या कर्मचारी पतसंस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या उपहार गृहामध्ये विक्री होणारे खाद्यपदार्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे जिवीत हाणी होण्याचा धोका असल्याची तक्रार जिल्हा अभिवक्ता संघाचे विशिष्ट सहाय्यक ऍड. जयपाल ढवळे यांनी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशांकडे केली आहे. या संदर्भाने दुसरी तक्रार जयपाल ढवळे आणि सदस्य ऍड.यशोनिल मोगले यांनी कर आयुक्तांकडे केली असून उपहारगृह चालकाकडे जीएसटी क्रमांक नसल्याचे त्या तक्रारीत म्हटले आहे.
आज 14 फेबु्रवारी रोजी जिल्हा न्यायाधीशांकडे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार आरोग्याचा कोणत्याही मापदंड न वापरता न्यायालयात खाद्यपदार्थ विक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ज्याद्वारे त्यात खाद्य पदार्थ खाणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका होवू शकतो. या संदर्भाची तक्रार केली तर उपहारगृह चालक अरेरावीने बोलतो असे सुध्दा या तक्रारीत लिहिलेले आहे. घडलेल्या घटनेची व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात आली असून ती आम्ही चौकशीच्या वेळी दाखवणार आहोत असे म्हटले आहे.
याच उपहारगृहाच्या संदर्भाने दुसरी एक तक्रार कर आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये या उपहारगृह चालकाकडे जीएसटी क्रमांक नाही. कायद्याच्या दृष्टीकोणातून आवश्यक असलेले बील हा उपहारगृह चालक देत नाही असे या तक्रारीत म्हटले आहे.

