अमेरिकेला जाता-जाता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये थांबले आणि तेथे मोदी-मोदी झाले, मोदीने फ्रान्समधूनच अमेरिकेला सेटल केल अशा खोट्या बातम्या प्रसारीत करणाऱ्या गोदी मिडीयाला थोडी तरी लाज वाटायला हवी होती की, फ्रान्सचे राष्ट्रपती इमोईल मायक्रो हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तांदोलन करीत नाहीत. पण त्याचा उल्लेख मिडीयाने कोठेच केलेला नाही. म्हणूनच आम्ही अनेकदा म्हणतो स.आदत हसन मंटो यांनी 50 च्या दशकात खरेच म्हटले होते. दुसरीकडे भारताचे वायुसेना प्रमुख एच.ए.एल.च्या चेअरमनला चांगलाच झटका देतात आणि आमचा तुमच्यावर विश्र्वास राहिला नाही असे सांगतात हा व्हिडीओ ऐकतांना असे वाटत आहे की, आमचा देशच सुरक्षीत नाही तर आमच्या सुरक्षेचे काय?
अमेरिकेला जाता-जाता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये थांबले. त्यांच्यासाठी राष्ट्रपती मायक्रोने रात्रीचे भोज आयोजित केले असे गोदी मिडीया सांगत आहे. त्यांना कसे गळ्याला लावले हे दाखवत आहे. ही प्रशंसा करतांना थोडीशी लाज सुध्दा गोदी मिडीयाला वाटत नाही. आमच्या मते वाटायला ही नको 800 कोटी रुपयांचा खर्च मोदीने मिडियावर केलेला आहे. पण भारताच्या पंतप्रधानाचा फ्रान्सच्या पंतप्रधानांनी केलेला अपमान एक भारतीय म्हणून आम्हाला सुध्दा पटणारा नाही. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर आमचे रक्त सळसळत आहे. तो रात्रीचा भोज फक्त नरेंद्र मोदीसाठी नव्हता. यामध्ये जे जगभरातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. त्या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांची उपस्थिती नव्हती.कारण ते मोदीच्या लोकप्रियतेला भिले असतील म्हणून ते तेथे आले नसतील असो. फ्रान्सचे राष्ट्रपती मायक्रो हे तेथे बसलेल्या लोकांना हस्तांदोलन करत असतांना एक व्हिडीओ आम्ही पाहिला. मोदी पहिल्या रांगेत बसलेले आहेत. मायक्रो मोदींच्या उजव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला हस्तांदोलन करतात. त्यानंतर मोदी आपला हात पुढे करतात. पण मायक्रो दुसऱ्या रांगेतील मोदीच्या मागील माणसाला हस्तादोंलन कर तात तेथून मायक्रोचा हात परत येत असतांना मोदी पुन्हा एकदा हस्तादोंलन करण्याचा प्रयत्न करतात. परंतू मायक्रो त्यांच्या डाव्या बाजूला बसलेल्या माणसाशी हस्तादोंलन करतात. हा भारताचा अपमानच आहे. गोदी मिडीयाला हा अपमान दिसला नसेल. कारण त्यांनी भरपूर काही खालेले आहे. पत्रकार म्हणून आम्ही असे जरुर म्हणून हा अपमान तुम्ही दाखवू नका पण खोटी वाहवाह तर करू नका. तरच ही पत्रकारीता जीवंत राहिल. मोदी-मोदी झाले हे म्हणण्यामध्ये त्या मागे ओव्हरसीज विंग कार्यरत असते. ते त्या ठिकाणच्या लोकांना जमवते, त्यांच्यासाठी वाहनांची सोय करते आणि ते लोक आपल्याला काही तरी मिळेल या आशेने तेथे येतात आणि मोदी-मोदी करतात यात मोठे काय आहे. भारताचा श्रीलंका होवू नये, यावर चर्चा घडविण्यापेक्षा गोदी मिडीया द्रोपदी मुर्मू यांना पुअर लेडी म्हणले गेले या शब्दांवर चर्चा घडवितात. यापेक्षा पत्रकारीतेचे दुर्देव दुसरे काही नाही.
सध्या भारतात सुरू असलेल्या एअरो इंडिया 2025 यामध्ये जगभरातील सुरक्षा उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यामध्ये हिंदुस्थान ऍरोनॉटीक लि.चे चेअरमन डी.के.सुनिल आणि वायुसेना प्रमुख अमरप्रितसिंघ सहभागी झाले. अमरप्रितसिंघ यांनी सुनिल यांना फटकारतांना आता तुमच्यावर माझा विश्र्वास राहिला नाही असे म्हटले तेंव्हा ते ऐकून आमच्या अंगावर काटे उभे राहिले. कारण हा प्रश्न आमच्याही सुरक्षेशी संबंधीत आहे. फ्रान्सकडून आघाडी सरकारने राफेल खरेदी करण्याचा करार केला तेंव्हा त्याची देखरेख करण्यासाठी एचएएलला तु म्ही करार करावा असा सल्ला होता. पण त्यावेळेस तो खरेदी करार झाला नाही. त्यानंतर मोदी सरकारच्या कालखंडात राफेल खरेदी करण्यात आले आणि राफेल खरेदी झाल्यावर त्याची देखरेख करण्यासाठी खेळण्यातील विमान बनविण्याचा अनुभव नसणाऱ्या अंबानीच्या कंपनीसोबत राफेलच्या कंपनीने करार केला. पुढे तोही करार रद्द झाला. पण तोपर्यंत राफेल बनविणाऱ्या कंपनीने देखरेखीचे कोट्यावधी रुपये अंबानीच्या कंपनीला हस्तांतरीत केले होते. हा तर मुख्य खेळ आहे.
एचएएलने भारतीय वायुसेनेची 99 विमानांची ऑर्डर अद्याप पुर्ण केलेली नाही. वायुसेनेने त्यांच्याकडे 200 विमानांची मागणी केलेली आहे. अमरप्रितसिंघ सांगत होते फेबु्रवारी 2025 मध्ये मी वायुसेना प्रमुख होईल तोपर्यंत 11 तेजस एमके-1 हे विमान तयार असतील असे तुम्ही सांगितले होते. पण एअरो इंडियामध्ये एचएएएलने उडवलेले एमके-1 हे विमान एमकेे-1 हे नाही. याचा अर्थ काय तर बनावट पणा आणि हे वायुसेना प्रमुख सांगत आहेत. विरोधी पक्षांनी संसदेमध्ये एचएएलवर आक्षेप घेतला तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले एचएएलचा शेअर मागील पाच वर्षामध्ये तीन पटीने वाढला आहे. त्यांच्याकडे 82 हजार कोटीची ऑर्डर आहे. तसे 55 हजार कोटीची ऑर्डर पाईपलाईनमध्ये आहे. पण ऑर्डर असेल हो. त्या ऑर्डरची डिलेव्हरी झाली काय? हा महत्वाचा प्रश्न आहे आणि ऑर्डर असणे आणि ती ऑर्डर पुर्ण न करू शकणे हा महत्वाचा प्रश्न आहे. अशा मोठ-मोठ्या गोष्टी संसदेत बोलून देशाला भ्रमीत करण्याचा हा प्रयत्न आहे. वायुसेना प्रमुख ही बाब मान्य करतात की, आमच्याकडे विमानांची खुप कमरता आहे. परंतू तो बहादर असे ही सांगतो की, कमी साधने असतांना कसे लढायचे याच्यात आम्ही निपुन आहोत. का भारताचे सरकार आमच्या त्या सैनिकांना योग्य साधने देत नाही ज्यातून ते आमची रक्षा करतात. नुसते खोटे बोलून आम्हीच सर्वात शहाणे आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न जास्त काळ टिकत नसतो. वायुसेना प्रमुख अमरप्रितसिंघ यांचे शब्द ऐकल्यानंतरची परिस्थिती घाम आणण्यासारखी आहे. भारताची सुरक्षा आता रामभरोसे आहे असेच म्हणावे लागेल.
सोर्स: न्युज लॉंचर..