आरटीई प्रवेशासाठी पालकांनी प्रलोभनांना बळी न पडण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

 

लातूर  : -आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते.यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. त्यामुळे  पालकांना त्यांच्या बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक(प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 मधील कलम 12(1)(सी)नुसार आरटीई 25 टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुली व मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. पालकांना प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देण्याचे गैरप्रकार निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक), प्रशासन अधिकारी महानगर पालिका/नगरपालिका, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे  यांच्या depmh2@gmail.com व आयुक्त(शिक्षण), पुणे यांच्या educommoffice@gmail.com या ई-मेलवर अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदवावी.

प्रलोभन देण्याचा असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरूपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!