नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 9 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा त्रिपिटक बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष बंटी लांडगे यांच्यावतीने होम मिनीस्टर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रभाग क्र. 18 मधील शेकडेा महिलांनी उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील देगावचाळ येथे त्रिपिठक बौद्ध विहार येथे सुप्रसिद्ध निवेदक युवराज शिंदे व श्रद्धा शिंदे यांचा होम मिनीस्टर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित विजेत्या महिलांना बंटी लांडगे यांच्यावतीने सोन्याची नथ, मानसी पैठणी व चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेच्या माजी उपमहापौर शीलाताई कदम तर स्वागताध्यक्ष म्हणून कमलताई लांडगे, वृषाली लांडगे यांची उपस्थिती होती. यावेळी अशोक हिंगोले, सचिन शिरशिला, ए.आर. बॅन्ड, अब्बू उमेर, राहुल जाधव, मिलिंद भेदेकर, आकाश डाकोरे, उमेश हिंगोले, चांदू पंडीत, भालचंद गवारे, सुदर्शन राजभोज, सुरज राजभोज यांची उपस्थिती होती.
