नांदेड(प्रतिनिधी)-2022 मध्ये खूनाच्या आरोपातून सुटलेल्या आरोपीचा 4 फेबु्रवारी रोजी खून झाल्याचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 9 फेबु्रवारी रोजी दाखल करण्यात आला आहे.
4 फेबु्रवारी रोजी रात्री 9.30 वाजेच्यासुमारास दत्ता हनुमंत कोल्हे (28) रा.भायेगाव ता.जि.नांदेड यांचे प्रेत किकी रस्त्यावरील लव्हेकर यांच्या खदानीजवळ सापडले होते. त्या दिवशी त्या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पुढे दत्ता कोल्हेचे बंधू गणेश हनमंत कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मयत भाऊ दत्ता हनुमंत कोल्हे हा संजय गोपीनाथ कोल्हे यांच्या खून प्रकरणातील आरोपी होता. 2022 मध्ये खुनाच्या गुन्ह्यातून त्याची सुटका झाली होती. 4 फेबु्रवारी रोजी त्याला विश्र्वनाथ गोपीनाथ कोल्हे(49) आणि गणेश संजय कोल्हे (27) या दोघांनी दत्ता हनुमंत कोल्हेचा धार-धार शस्त्रांचा वापर करून खून केला. त्याचे प्रेत पोत्यात टाकून सिमेंटच्या फेन्सींगच्या खांबांना प्रेत बांधलेले पोते बांधून टाकले. दत्ता कोल्हेची दुचाकी सुध्दा बांधून टाकली अशा प्रकारे पुरावा नष्ट केला. मारेकऱ्यांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 139/2025 दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मांटे हे करीत आहेत.
चार फेब्रुवारी रोजी सापडलेल्या मयत व्यक्ती संदर्भाने खूनाचा गुन्हा दाखल
