गोदावरीन नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे 3 सेक्शन पंप पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-आजचा सुर्योदय होण्याअगोदरच मौजे कल्लाळ, बोरगाव येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध उपसा करणाऱ्या यंत्रांची जप्ती करण्यात आली आहे. या यंत्रांची किंमत 12 लाख रुपये आहे.
शासनाकडून रेती धोरण जाहीर होत असते आणि ते धोरण जाहीर झाल्यावर कायदेशीर रित्या रेती धक्यांची विक्री होते. त्यानंतर ते धक्के खरेदी करणाऱ्याने त्यातून वाळू उपसा करावा ही सर्वसामान्य पध्दत आहे. वाळू उपसा करतांना तेथे सुध्दा बेईमानी होते. दहा फुट रुंद दहा लांब असा तो धक्का असेल तर त्यात 3 फुट खालपर्यतच खड्डा करता येतो आणि ती रेती काढता येते परंतू रेती धक्का खरेदी करणारे या दहा आकड्यावर दोन्हीकडे एक-एक शुन्य लावतात आणि 3 या आकड्यावर एक शुन्य लावतात हा सुध्दा बेकायदेशीर प्रकार आहे.
त्या शिवाय नदीपात्रातून नदीपात्रातून वाळू तर उपसताच येत नाही. याशिवाय वाळूची वाहतुक सुर्यास्त ते सुर्योदय या वेळेत करता येत नाही. वाळूची वाहतुक करतांना भरलेल्या महसुलाची पावती त्या ठिकाणी काम करणाऱ्यांकडे असावी. वाळू वाहतुक करतांना सुध्दा गाडी चालकाकडे त्या महसुलाची पावती असणे आवश्यक आहे. परंतू सर्व काही चालतच आहे, चालत आले आहे आणि पुढे सुध्दा चालणार आहे.
पण आजचा सुर्योदय होण्यापुर्वीपासूनच बदली झालेले जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार संजय वारकड, स्वप्नील दिगलवार, मंडळाधिकारी नन्हु कानगुले, कुणाल जगताप, राजेंद्र शिंदे, ग्राम महसुल अधिकारी रणविरकर, खेडकर, कदम, सकवान, माधव भिसे आदींनी मौजे कल्लाळ आणि बोरगाव शिवार गाठले. या शिवारामध्ये सेक्शनपंपद्वारे नदीपात्रातून वाळूचा उपसा करणे सुरू होते. या सेक्शनपंपला के्रनच्या सहाय्याने नदीकाठी आणण्यात आले आणि त्याची जप्ती झाले. या यंत्र सामुग्रीची किंमत 12 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!