बिलोली (प्रतिनिधी)-शहरातील गांधीनगर भागात खाजगी शिकवणीचे वर्ग चालवणारा शिक्षक याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विद्यार्थीनिने चिठ्ठी लिहून स्वतःचे घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
इयत्ता 10 वी च्या शिक्षणासाठी राजेश देविदास कागळे यांच्याकडे खाजगी शिकवणी वर्गास सदर पिडीत मुलगी जात होती.अंदाजे 8 महिण्यापासून शिकवणी वर्गात असतांना कागळे हे वाईट उद्देशाने वर्गात टॉन्ट मारणे व इतर वाईट कृत्य करणे यासह गणिताचे व विज्ञानाचे प्रॅक्टीकलचे मार्कस माझे हातात आहेत म्हणून धमकावत असत अशी तक्रार पिडीत मुलीने वडिलाकडे तक्रार केली होती.त्यानंतर सुध्दा सदर शिक्षक आरोपीने पिडीतेला शिकवणी वर्गामध्ये नेहमी टॉंट मारत मानसिक त्रास देत होते.दि.15 फेबु्रवारी 2017 रोजी पिडीतेचे आई व बाबा बाहेरगावी गेले असता अंदाजे वेळ 10 ते 1.30 वाजताच्या सुमारास पिडीता शिकवणी वर्गाला गेली असता यातील आरोपीने तिला काहीतरी वाईट हेतून मनाला वेदना होतील असे शब्द बोलले असल्याने पिडीतीने त्या शिक्षक आरोपीच्या त्रासाला कंटाळून चिठ्ठी लिहून स्वतःचे घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती.पिडीतेच्या वडीलांनी बिलोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता तक्रारीवरुन पो.स्टे.बिलोली येथे गुन्हा क्र. 25/2017 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला व सदर गुन्हयाचा तपास पुर्ण होऊन दोषारोप पत्र मा.जिल्हा व अति.सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आले होते.सरकातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले मा.न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करुन तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राहय धरुन जिल्हा व अति.सत्र न्यायाधीश यांनी दि. 04 फेबु्रवारी 2025 रोजी बिलोली येथील जिल्हा न्यायधीश वर्ग 1 तथा अति.सत्र न्यायधीश बिलोली दिनेश ए.कोठलीकर यांनी आरोपी राजेश देविदास कागळे वय 37 वर्षे, रा.मु.पो. मंगनाळी ता.धर्माबाद ह.मु. बिलोली ता.बिलोली, जि. नांदेड यांना कलम 305 भा. द. वि. अंतर्गत दोषी ठरवुन तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु 25 हजार रुपये व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.सरकातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदिप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली.सदर प्रकरणात त्यांना तपासिक अमलदार एस.एस. दळवे पो.नि.पो.स्टे. बिलोली व पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख महेबुब शेख अहेमद हुसेन पो. स्टे. बिलोली यांनी सहकार्य केले.
शिकवणीसाठी आलेल्या मुलीला आत्महत्तेस प्रवृत्त केल्या प्रकरणी शिक्षकाला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
