नांदेड- शहरातील सिडको येथील कागणे नगर येथे राष्ट्रसंत भगवान बाबा सभागृह बांधकामाचे भूमिपूजन लक्ष्मण कागणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वंजारी संघाचे जिल्हाध्यक्ष संतराम गीते, शिवसेना जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे, मनपाचे सह आयुक्त गिरीश कदम, अभियंता स्वामी, टाकळीकर, मुलंगे, वंजारी संघाचे उपाध्यक्ष श्रीकर फड, मयुरेश धानोरकर, चंद्रकांत मुंडे, नामदेव केंद्रे, पंढरीनाथ आघाव, भाजपा कार्यकर्ते राजेश केंद्रे, रमेश धात्रक आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रसंत भगवान बाबा सभागृहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन कोटींचा निधी आणल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, सभागृहकरिता मोकळी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल ऍड. नितीन कागणे, आशिष बियाणी तसेच चार्टड अकाउंटंट करवा यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

