नांदेड :- संचालनालय, लेखा व कोषागारे, कर्मचारी कल्याण समितीकडून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता कोषागारे कर्मचारी नांदेड यांना पोलिस कॉन्स्टेबल सदानंद सपकाळे यांनी सलामी व पथसंचलन यांचे प्रशिक्षण देऊन तयार केले. कोषागारे कर्मचारी यांनी सुंदर असे सलामी व पथसंचलन केले आणि विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रथम पारितोषक आणले आहे. त्याबद्दल नांदेड पोलिस दलात कार्य करणारे पोलिस कर्मचारी सदानंद सपकाळे यांना जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड अलंकृताल कश्यप बगाटे , बालाजी देशमाने, अध्यक्ष कर्मचारी संघटना नांदेड यांनी पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला व पुढील कार्यास शभेच्छा दिल्या.
More Related Articles
26 व्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ;जिल्हा सैनिक कार्यालयात 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड – जिल्हा सैनिक कार्यालयात 26 जुलै 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता कारगिल विजय…
अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार
नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला…
आयटीएम कॉलेजमध्ये एचआयव्ही विषयावर शिबिर संपन्न
नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली…
