नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने 8 आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नियुक्त्यांचे आदेश अपर मुख्य सचिव(सेवा) व्ही.राधा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने काल दि.28 जानेवारी रोजी राज्यातील 8 भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. प्रधान सचिव(वित्तीय सुधारणा) वित्त विभाग मंत्रालय मुंबई या पदावर रिचा वागला यांना नियुक्ती मिळाली आहे. राज्याच्या सचिव(ले.व को.) वित्त विभाग मंत्रालय मुंबई या पदावर शैला ए.यांना नियुक्ती देण्यात आली आहे. गणेश पाटील यांना सचिव मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. सुहास गाडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली या पदावर पाठविले आहे. कृष्णकांत कनवारीया यांना सहाय्यक जिल्हाधिकारी शाहदा उपविभाग जिल्हा नंदुरबार येथे पाठविण्यात आले आहे. महेश आव्हाड यांना महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई येथे पाठविले आहे.
आठ आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या
![](https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2025/01/The-Himachal-government-is-already-facing-a-shorta_1721496257866.jpg)