नांदेड(प्रतिनिधी)-कायदेशीर वाळूच्या वाहतुकीसंदर्भाने 17 हजारांची लाच स्विकारणाऱ्या कुंडलवाडीच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकासह पोलीस उपनिरिक्षकाला बिलोली न्यायालयाने पोलीस कोठडी संपल्यानंतर सध्या वास्तव्यासाठी तुरूंगात पाठविले आहे. ज्या ठिकाणी या दोघांनी अनेकांना पाठवले तेथेच राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
23 जानेवारी रोजी कायदेशीर वाळू वाहतुक करणाऱ्या एका वाळु वाहतुकदाराने दिलेल्या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कुंडलवाडी येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत नागरगोजे आणि पोलीस उपनिरिक्षक नारायण शिंदे या दोघांना अटक केली. 24 ते 27 जानेवारी या दरम्यान त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. 27 जानेवारी रोजी एसीबीच्या विनंतीनुसार त्या दोघांची रवानगी सध्या तुरूंगात करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांच्यावतीने ऍड. अमित डोईफोडे आणि मनोज आरळीकर हे आज 28 जानेवारी रोजी जामीन अर्ज सादर करणार आहेत. त्यानंतर त्यावर सुनावणी होईल आणि सुनावणीनंतर आदेश होईल. अनेकांना भागवत नागरगोजे आणि नारायण शिंदे यांनी ज्या तुरूंगात पाठविले. त्या तुरूंगात राहण्याची वेळ त्यांच्यावर आज आली आहे.
एपीआय आणि पीएसआय सध्या तुरूंगात
