अनेक प्रसार माध्यमांनी नरेंद्र मोदींच्या बुटाखाली आपली नैतिकता घासली आणि आदीवासी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंचे अवमुल्यन केले

दिवासी असलेल्या भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि राष्ट्रपती या व्यक्तीमत्वाचे अवमुल्यन करणाऱ्या वर्तमानपत्रांनी आपले नाक सत्ताधिश आणि ताकतवान नेत्यांच्या बुटांवर रगडण्याचा प्रकार प्रजासत्ताक दिन समारोहाचे वृत्तांकन करतांना केला आहे. हा प्रकार भविष्यासाठी अत्यंत भितीदायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:सुध्दा राष्ट्रपती या संस्थेचा अपमान केला आहे.
26 जानेवारी हा दिन भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधानाचा महोत्सव दिन आहे. भारताचे राष्ट्रपती संविधानाचे अभिभावक असतात. ज्या-ज्या ठिकाणी संविधानाला धक्का लागेल त्या-त्या ठिकाणी राष्ट्रपतींनी त्यात दखल देणे हा त्यांचा अधिकार आहे. एकंदरीतच 26 जानेवारी हा दिन राष्ट्रपतींचा असतो आणि यंदाच्या 26 जानेवारी रोजी आदिवासी समाजाच्या महिला द्रोपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत. 26 जानेवारीला तिरंगा फडकवणे, सैन्य दलाकडून सलामी घेणे, विविध राज्यांकडून आलेल्या देखाव्यांचे निरिक्षण करणे हे सर्व अधिकार द्रोपदी मुर्मू यांचे आहेत.
26 जानेवारीचा कार्यक्रम संपल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मिनिट 32 सेकंदाचा एक व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला. त्यामध्ये हा कार्यक्रम राष्ट्रपतींचा नसून पंतप्रधानांचा आहे असे दिसते. फक्त एका सेेकंदासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू त्या व्हिडीओमध्ये दिसतात आणि ते सुध्दा अत्यंत चालाखीने असे दाखवले आहे की, त्यात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या पंतप्रधानांचे स्वागत करत आहेत असे दिसते. खरे तर 26 जानेवारी रोजी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे स्वागत करायचे असते. पंतप्रधानांसाठी भारतात 15 ऑगस्ट हा दिवस आहे. लाल किल्याच्या परकोट्यावरून तिरंगा फडकवला जातो आणि पंतप्रधान देशाला संबोधित करतात. परंतू 26 जानेवारी हा दिन संपुर्णपणे राष्ट्रपतींचा आहे. पंतप्रधानांनी अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये कोठेच राष्ट्रपतींना महत्व दिसत नाही. संपूर्ण कार्यक्रम हा त्यांचाच आहे असे वाटते आणि त्याच पध्दतीने तो रेकॉर्डींग करून अपलोड केलेला आहे. म्हणजे जाणून बुजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुमू यांचे अवमुल्यन केले आहे. मागील राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुध्दा निरोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडात त्यावेळी मोदींनी दाखवलेली प्रतिक्रिया सुध्दा अशीच काही तरी अवमुल्यनाची आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा कोठेही तिरंगा फडकवतांना, शस्त्र दलाकडून सलामी घेतांना, मंचावर उभ्या असतांना, मान्यवरांशी नमस्कार करतांना असा कोणताही क्षण पंतप्रधानांच्या व्हिडीओमध्ये नाही. हे सर्व कट रचून करण्यात आले आहे आणि वर्तमानपत्रांनी सुध्दा काय छापावे हे सुध्दा मोदींनीच ठरवलेले होते.
भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणवणाऱ्या वर्तमानपत्रांनी नरेंद्र मोदींच्या बुटावर आपले नाक रगडले आहे. राष्ट्रपतींच्या व्यक्तीमत्वाला धक्का लावला आहे. द टाईम्स ऑफ इंडिया हा देशातील सर्वात मोठे वर्तमानपत्र आहे असे सांगितले जाते. त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात तीन फोटो छापले आहेत. एक फोटो देखाव्याच्या रथाची आहे. दुसरी फोटो सैन्यातील महिला अधिकारी दत्ता सेल्युट मारतांना आहे आणि तिसरी फोटो नरेंद्र मोदी, इंडोनेशियाचे राष्ट्रपती यांच्यासोबत गळा भेट घेत आहेत. राष्ट्रपतींचा एकही फोटो या वर्तमानपत्रात नाही. या वर्तमानपत्राच्या दुसऱ्या पानांवर सुध्दा राज्यांच्या देखाव्यांशिवाय कोणताही फोटो छापलेला नाही. संपादक जेंव्हा सत्ता संस्थान आणि ताकतवान नेत्यांच्या बुटावर डोके ठेवतात तेंव्हा असे घडते. आज संविधानाचा उत्सव आहे, प्रजासत्ताक दिन आहे हे सुध्दा द टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक दिवाकर आस्थाना विसरले होते आणि ते एवढे मुर्ख असतील असे वाटत नाही. कारण एवढ्या फोटोंमध्ये राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा लावला असता तर त्यांचे काही बिघडले नसते. पण पंतप्रधानांच्या बुटांवर नाक घासणारे संपादक हेच करणार ना. दुसरे वर्तमानपत्र हिंदुस्थान टाईम्स कधी हा पेपर कॉंगे्रसचा होता. याच्या मालकीन आहेत शोभना भरतीया आणि संपादक आहेत कुणाल प्रधान. यांनी सुध्दा राष्ट्रपतींचा एकही फोटो छापला नाही. हिंदुस्थान या वर्तमान पत्राचे संपादक पंडीत शशी शेखर आहेत. त्यांनी सुध्दा संविधान आणि राष्ट्रपतींच्या उत्सवाला काही महत्व दिलेले नाही. एकोनॉमिक टाईम्स याचे संपादक आहेत. पंडीत राजकमल झा. यांच्या वर्तमानपत्रात तर हा कार्यक्रम 26 जानेवारीचा दिसतच नाही तर तो 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे असे दिसते. जनसत्ता या वर्तमानपत्राच्या संपादक आहेत चैताली चक्रवर्ती यांनी सुध्दा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या समारंभात त्यांना महत्व दिलेले नाही.
एकंदरीत का घडले असेल असे. सवर्णवादी मिडीया आदीवासी राष्ट्रपतींसोबत घृणा करत आहे. आपल्या संपुर्ण नैतिकतेला मोदींच्या बुटाखाली समर्पित करून दाखवत आहेत. आदीवासी राष्ट्रपती म्हणूनच नरेंद्र मोदींनी सुध्दा ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे अवमुल्यन जाणवते. ज्या संपादकांची नावे आम्ही लिहिली आहेत. त्यांना कोट्यावधी रुपये वर्षाची पगार आहे. तरी पण त्यांनी प्रजासत्ताक दिन मोदींचा होता असे दाखवून आपल्या वाचकांसोबत, आपल्या प्रेक्षकांसोबत गद्दारी केली आहे. आपले अत्यंत नागवेपण दाखवणाऱ्या या वर्तमानपत्रांची परिस्थिती पाहुन पुढील भविष्याचे दिवस अत्यंत भितीदायक वाटतात. असे करून मोठ-मोठया प्रसार माध्यमांच्या संपादकांनी आपली बुध्दी, विवेक आणि आपली पत्रकारीता हवेत विरुन टाकली आहे. कोणत्या गिरीची पिठ खात असतील हे संपादक, कोणत्या तोटीचे पाणी पित असतील हे संपादक, कोणता तरल अथवा घट्ट पदार्थ खात असतील ज्यामुळे आपली नैतिकता त्यांनी घाण ठेवली आहे. आता वाचकांनी आणि प्रेक्षकांनी हे स्वत: ठरवायचे आहे की, तुमचा मिडीया कोण असावा, कसा असावा ही वेळ आलेली आहे.
नांदेडमधील कवि शैलेश कवटेकर यांच्या एका कवितेतील शेवटचे चार वाक्य आम्ही वाचकांसाठी सादर करत आहोत.
हल्ली खुप जन लिहितात,
फुकट आहे प्रत्येकाला धुमारे,
पण विरांनो लिहितांना,
सत्य व सत्व जरा जपारे..

सोर्स: आर्टीकल 19-नवीनकुमार-18 तासात 5.80 लाख प्रेक्षक .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!