इस्लापूर ग्रामपंचायत लिपिक पदभरतीचा निकाल देण्यासंदर्भात आमरण उपोषण..

किनवट(प्रतिनिधी)-इस्लापूर ग्रामपंचायत पद भरती लिपिक वर्ग चार या पदासाठी परीक्षा निकाल प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल सहा महिने पूर्ण झाले तरी अद्याप पर्यंत इस्लापूर ग्रामपंचायत ने लिपिक पदासाठी कुठलाही निकाल न दिल्याने परीक्षार्थी सत्येश्वर परमेश्वर पेशवे यांनी निकाल देण्यासंदर्भात इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे .

इस्लापूर ग्रामपंचायतने लिपिक पद भरतीसाठी दिनांक 13 जुलै 2024 रोजी दैनिक प्रजावाणी या वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रगटन देऊन लिपिक पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती व दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी लिपिक पदाची परीक्षा घेण्यात आली या लिपिक पदाच्या परीक्षेसाठी एकूण 44 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी 41 विद्यार्थ्यांनी लिपिक पदासाठी परीक्षा दिली होती.

सदरील परीक्षा ही ग्रामपंचायत नियमावली प्रमाणे घेण्यात आली व या परीक्षेचे पेपर तपासणी व निकाल घोषित करण्याची प्रक्रिया 15 ऑगस्ट 2024 रोजी ठेवण्यात आली असता परीक्षार्थींच्या प्रत्यक्ष समोरासमोर उपस्थित दर्शनी पेपर तपासणी करण्यात आली होती.

या सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आल्या मात्र या लिपिक पदाचा निकाल सूचना फलकावर लावण्यात आला नाही प्रक्रिया घोषित करण्यासंदर्भात दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सत्तेश्वर पेशवे यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली पण ग्रामपंचायतिने कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने ग्रामपंचायतच्या बेबनावामुळे पदाधिकाऱ्यांच्या एकमत न झाल्याने मुद्दामहून निकाल प्रक्रिया रखडण्यात आल्याने अखेर 26 जानेवारी 2025 रोजी उपोषणकर्ते सत्येश्वर परमेश्वर पेशवे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला सदरील उपोषणार्थीस उपोषणास बसण्यास ग्रामपंचायतानेच भाग पाडले म्हणणे अवघे ठरणार नाही अशी चर्चा आता इस्लापूर येथिल सुज्ञ नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!