नांदेड(प्रतिनिधी)-आज 25 जानेवारीचा सुर्योदय होण्यापुर्वीच्या रात्री 12 वाजेपासून एस.टी.दरात वाढ करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पुर्वी प्रत्येक टप्पा अर्थात 6 किलो मिटरसाठी असणारा दर जवळपास 4 रुपयंानी वाढला आहे.
विभाग नियंत्रक नांदेड यांच्या आदेशाने जारी झालेल्या परिपत्रकानुसार पेट्रोलियम पदार्थ(डिझेल), चेसीज, टायर आणि महागाई भत्यातील मुल्यांमध्ये बदल झाल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरण आणि एस.टी.संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार 25 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपासून एस.टी.भाड्यात वाढ करण्यात आली आहे.
झालेली दर वाढ पुढील प्रमाणे आहे. प्रत्येक टप्पा म्हणजे 6 किलो मिटरसाठी पुर्वी साध्या गाडीला 8.70 रुपये तिकिट होते ते आता 10.05 असे झाले आहे. त्यात प्रौढ व्यक्तींना आता भाडे 11 रुपये द्यावे लागेल आणि मुलांसाठी 6 रुपये निश्चित करण्यात आली आहे. निमआराम गाडीमध्ये पुर्वी 11.85 रुपये भाडे होते आता ते 13.65 झाले आहे. प्रौढांसाठी 15 रुपये आणि मुलांसाठी 8 रुपये असे भाडे राहिल. बिना वातानूकुलूत शयन आणि आसनी गाड्या पुर्वी या गाड्यांचे भाडे 11.85 रुपये होते. आता ते 13.65 झाले आहे. बिना वातानुकूलीत शयनयान गाड्या पुर्वीचे भाडे 12.85 नवीन दर14.75. शिवशाही वातानुकूलीत पुर्वीचे भाडे 12.35 आताचे भाडे 14.90. शिवनेरी वातानुकूलीत पुर्वीचे भाडे 18.50 आताचे भाडे 21.25. जनशिवनेरी वातानुकूलीत पुर्वीचे भाडे 12.95 आताचे नवीन दर 14.90. ई बस 9 मिटर वातानुकूलीत पुर्वीचे दर 12 रुपये आताचे दर 13.80 रुपये. ई शिवाई बस सेवा वातानुकूलीत पुर्वीचे दर 13.20 आताचे दर 15.15 असे ठरविण्यात आले आहे.