नांदेड(प्रतिनिधी)-देशभरातील 942 विविध विभागतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतीच्यावतीने मिळणारे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात शौर्य पदक प्राप्त करणारे-95, प्रतिष्ठीत सेवेसाठी पदक प्राप्त करणारे-101, गुणवत्ता पुर्ण सेवा देणारे-746 जणांचा समावेश आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस उपनिरिक्षक आणि एक पोलीस हवालदार अशा दोघांना गुणवत्ता पुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले आहे.
केंद्र सरकारच्यावतीने दरवर्षी 26 जानेवारीच्या पुर्वी पोलीस पदक दिले जातात. त्यात पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक आणि नागरी सुरक्षा, सुधारणात्मक सेवा या विभागांना ही पदके दिली जातात. मेडल फॉर गॅलंट्री(शौर्य पदक), प्रेसिडेंट मेडल फॉर डिस्टींगविश सर्व्हीस(प्रतिष्ठीत सेवा पदक), मेडल फॉर मेरिटोरिएस सर्व्हीस (गुणवत्ता पुर्ण सेवा पदक) अशा तिन विभागांमध्ये ही पदके दिली जातात. त्यात देशभरात 95 जणांना शौर्य पदक मिळाले आहे, 101 जणांना प्रतिष्ठीत सेवा पदक मिळाले आहे आणि 746 जणांना गुणवत्ता पुर्ण सेवा पदक मिळाले आहे.
यात नांदेड जिल्ह्यातील नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस उपनिरिक्षक संजय अंबादासराव जोशी आणि पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कार्यरत पोलीस हवालदार दिलीप भोजुसिंग राठोड या दोघांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. वास्तव न्युज लाईव्ह परिवार राष्ट्रपती पदक प्राप्त करणाऱ्या नांदेड येथील जोशी आणि राठोड यांच्यासह देशभरातील हा सन्मान प्राप्त करणाऱ्या सर्वांचे कौतुक करीत आहे.
सोबत पदक जाहीर झालेल्या 942 जणांची पिडीएफ संचिका वाचकांच्या सोयीसाठी जोडली आहे.
AnnouncementofMedal_2025_25012025