नांदेड :- शनिवार 22 मार्च 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन , ई-चालन या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 22 मार्च 2025 रोजी लोकअदालत आयोजित केली आहे. तरी या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित केलेल्या या लोकअदालतीमध्ये वाहनचालक, मालक यांनी हजर राहावे. तसेच तडजोड पध्दतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा व सर्वानी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 647 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विष्णुपूरीच्या पाईपलाईनमध्ये लिकेज हजारो लिटर पाण्याची नासाडी ‘ॲग्रीस्टॅक’ योजना शेतीच्या लाभासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक