नांदेड : -डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांचे मार्फत आयोजित अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एक दिवशीय प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एकदिवसीय प्रबोधन पर कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र जाधव प्र. पोलीस अधीक्षक (नांहस ) परिक्षेत्र नांदेड होते .तर उद्घाटक अभिजीत राऊत (भा.प्र.से) जिल्हाधिकारी नांदेड हे होते .तर प्रमुख पाहुणे डॉ. अश्विनी जगताप (डी वाय एस पी) नांदेड ,श्रीमती छाया कुलाल सदस्य सचिव तथा उपयुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड श्रीमती शफकत आमना,सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम महापुरुषाच्या प्रतिमेस मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड यांचे शिवानंद मिनगीरे यांनी सहाय्य आयुक्त, समाज कल्याण यांनी पुष्पगुच्छ व संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात केले .
मंचावर उपस्थित सर्व मान्यावाराचे पुष्पगुच्छ व संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले.
दादासाहेब गीते, माजी उपजिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रशिक्षण विभाग हे एक दिवसीय प्रबोधन पर कार्यशाळेचे प्रस्तावित केले .
तदनंतर बार्टी तज्ञ व्याख्याते ट्रेनर सुभाष केकान हे ॲट्रॉसिटी अंतर्गत होणारे गुन्हाचे प्रमाण कमी होण्यास करिता प्रेझेंटेशन मार्फत मार्गदर्शन व व्याख्यान दिले. तदनंतर माननीय श्रीमती मीनाकुमारी बतुला डांगे सहाय्यक शासकीय अभियुक्त यांनी न्यायालयीन प्रक्रिये बाबत मार्गदर्शन केले . तदनंतर कार्यशाळेचे उद्घाटक अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड यांनी सदर ॲट्रॉसिटी ऍक्ट कायदा अंतर्गत गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्याकरिता तालुकास्तरीय समिती स्थापन करून तालुकास्तरावर ॲट्रॉसिटी ऍक्ट कायद्याचे प्रचार व प्रसिद्धी होऊन सदर कायदा अंतर्गत गुन्हेच दाखल होऊ नये,या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
श्रीमती शफकत आमना सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट बद्दल माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले तद्नंतर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळेचे अध्यक्ष जितेंद्र जाधव प्रभारी पोलीस अधीक्षक (ना .ह .स ) नांदेड त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत मत व्यक्त करून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत येणारे विविध समस्या आणि त्याचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन सहारे प्रकल्प व्यवस्थापक बार्टी ‘पुणे यांनी अभार प्रदर्शन केले व शेवटी ॲट्रॉसिटी ऍक्ट कायदा अंतर्गत एक दिवशीय प्रबोधन पर कार्यशाळेचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .
सदर एक दिवशीय कार्यशाळा माननीय श्री.शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज केल्यानंतर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .