नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगर येथे 22 जानेवारी रोजी सायंकाळी एका 17 वर्षीय बालकाचा खून झाला होता. तो खून करणाऱ्या सहा अल्पवयीन बालकांना विमानतळ पोलीसांनी अत्यंत तत्परता दाखवत 48 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. शिक्षण घेण्यासाठी आलेली बालके गुन्हेगारीकडे कशी वळत आहेत, त्याची कारणे काय आहेत, त्यावर उपाय काय आहेत. यावर सामाजिक स्तरावर चर्चा घडून तोडगा निघायला हवा तरच हा सर्व प्रकार थांबेल.
दि.22 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आनंदनगर राज मॉलमध्ये एका 17 वर्षीय बालकाला तिक्ष्ण हत्यारांनी गोंदुन त्याचा खून झाला. राज मॉलमध्ये रक्तच रक्त सांडले होते. जखमी अवस्थेतील बालक साईनाथ प्रकाश कोळेकर (17) रा.आखाडा बाळापूर जि.हिंगोली यास दवाखान्यात नेले असता. तो दवाखान्यात पोहचण्यापुर्वीच मरण पावलेला होता.
या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेवून आणि आपल्या कौशल्याचा वापर करून विमानतळचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष जोंधळे, पोलीस उपनिरिक्षक विनोद साने, महिला पोलीस उपनिरिक्षक बोबडे यांच्यासह पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, रितेश कुलथे, डोईफोडे, शेख जावेद, नागनाथ स्वामी, राजेश माने, शेख शोयेब आणि हरप्रितसिंघ सुखई यांनी अत्यंत धावपळ करून अगोदर तीन आणि नंतर तीन अशा दोन टप्यात 6 मारेकऱ्यांना अटक केली. हे सर्व मारेकरी अल्पवयीन असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या सर्वांनी मिळून साईनाथचा खून का केला याचा शोध घेतला असता. विविध कारणे सांगण्यात येत आहेत. या सर्व कारणांचा उव्हापोह होवून त्यावर चर्चा घडविण्याची गरज आहे. तरच बाहेरगावहून शिक्षण घेण्यासाठी नांदेडमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या विषयावर काही तरी तोडगा निघेल. विमानतळ पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करायला हवे.
संबंधीत बातमी…