नांदेड(प्रतिनिधी)-कायदेशीर वाळू वाहतुक करणाऱ्या वाहतुकदाराकडून 17 हजार रुपये लाच स्विकारल्यानंतर कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक या दोघांना अटक झाली. आज बिलोली विशेष न्यायालयाने ए.पी.आय. आणि पीएसआयला तीन दिवस पोलीस कोठडी पाठविले आहे.
कुंडलवाडी पोलीस ठाण्यात 23 जानेवारी रोजी कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत नागरगोजे आणि पोालीस उपनिरिक्षक नारायण शिंदे या दोघांना कायदेशीर वाळू डेपोवरून कायदेशीर पणे हायवा गाडीत वाळू वाहतुक करण्यासाठी त्या वाहतुकदाराकडून 17 हजार रुपये लाच घेतांना लातूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून पकडले आणि गुन्हा दाखल केला आणि एपीआय आणि पीएसआयला अटक केली.
आज नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरिक्षक प्रिती जाधव आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी पकडलेल्या एपीआय नागरगोजे आणि पीएसआय शिंदेला बिलोली न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. बिलोली न्यायालयाने या विनंतीवरुन सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत जायभाये आणि पोलीस उपनिरिक्षक नारायण शिंदे या दोघांना तिन दिवस पोलीस कोठडी पाठविले आहे.
संबंधीत बातमी….