नांदेड : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छूक पात्र बचतगटांनी ऑनलाईन अर्ज http://mini.mahasamajkalyan.in या संकेत स्थळावर भरुन त्याची सत्यप्रत 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत समाज कल्याण सहायक आयुक्त नांदेड या कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयान्वये 8 मार्च 2017 रोजी निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
More Related Articles
नांदेड ग्रंथोत्सवात ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद- अ.वा. सूर्यवंशी
नांदेड – नांदेड येथील गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे आयोजित नांदेड ग्रंथोत्सवास ग्रंथसाहित्य व स्पर्धा…
बूमचा माज की पत्रकारितेचा बाज? नांदेडमधील प्रकाराने उभे केले अस्वस्थ करणारे प्रश्न
बूमवर नाव मोठं, पण पत्रकारिता किती मोठी? नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये पालकमंत्री यांच्या उपस्थितीत घडलेला…
धर्माबाद तालुक्यात एसडीआरएफ मार्फत पुरग्रस्तांचा यशस्वी बचाव
नांदेड- धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील अनेक गावांमध्ये बॅकवॉटरमुळे शेती पाण्याखाली गेली असून दिग्रस व…
