नांदेड(प्रतिनिधी)-एका दिल्लीच्या माणसाने लोन मंजुर करून देण्यासाठी लागणारी फिस म्हणून धर्माबाद येथील एका व्यक्तीची 4 लाख 58 हजार 212 रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.
शेख अजीम अब्दुल रहिम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान सुमित आहुजा रा.न्यु दिल्ली याने त्यांना लोन मंजुर करून देतो असे आमिष दाखवले. त्या कर्जाची प्रक्रिया फिस व इतर फिस असे 4 लाख 58 हजार 212 रुपये स्वत:च्या अकाऊंटवर पाठवायला सांगितले. त्याप्रमाणे ते पाठविण्यात आले. पण फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख अजीम अब्दुल रहिम यांनी पोलीस ठाणे धर्माबाद येथे तक्रार दिली. त्यानुसार धर्माबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 24/2025 नुसार दाखल केली आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड हे करणार आहेत.