नांदेड(प्रतिनिधी)-दोन विद्यार्थ्याला 14 आणि इतर पाच नाव न माहित असलेल्या 19 जणांनी मिळून अनिकेत सूर्यवंशीसोबत का राहतोस या कारणासाठी जबर मारहाण केली.
रोहित माधव पुंडगे (23) हा विद्यार्थी 12 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 ते 8 वाजेदरम्यान भगिरथनगर येथील जिराईत मैदानाकडे गेला असता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्र होता. तेथे अनिल पंजाबी, भैय्या मिरासे, साई लाला, विशाल भंडारी, योगी पेंडेलवाल, रितेश यादव, सोनु राऊत, कृष्णा भंडारी, अमोल भंडारी, ओमकार भंडारी, शुभमलाला,दिग्वीजय नारगुडे, मितेश पाटील, शेख समीर उर्फ सॅम जेरी या 14 जणांनासह इतर नाव माहित नसलेले पाच अशा 19 जणांनी रोहित पुंडगेला तु अनिकेत सुर्यवंशीसोबत का राहतोस म्हणून शिवीगाळ केली, गावठी कट्याच्या बटने, तलवारीने, खंजीरने त्याला आणि त्याच्या मित्राला जबर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 23/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक एन.के.वाडेवाले अधिक तपास करीत आहेत.