राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडास्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराची सांगता व राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेची जय्यत तयारी “

नांदेड :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा हौसी बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 9 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड येथे संपन्न झाले आहे.

या खेळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 14 ते 18 जानेवारी,2025 या कालावधीत नांदेड येथे संपन्न होणार असून या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभाग होणार आहे. या संघाची जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे. यासाठी क्रीडा मार्गदर्शक मुले संघासाठी ज्ञानेश काळे (सातारा) व मुली संघकरीता आनंदा कांबळे (नांदेड) हे आहेत तर संघव्यवस्थापक म्हणुन डॉ. राहुल श्रीरामवार व श्रीमती शिवकांता देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या संघात पुढील प्रमाणे खेळाडूंचा समावेश असून यामध्ये 19 वर्षे मुले- शुभम धोत्रे (पुणे), श्रीवर्धन बनसोडे (परभणी), निखील माने (पुणे), शिवराज शिंदे (पुणे), अदित्य गवळी (जळगांव), प्रज्वल पाटील (कोल्हापूर), दक्षरामटेके (यवतमाळ), सार्थकगावडे (मुंबई), तौफिकशाहू (अमरावती), रणवीरजाधव (पुणे), युवराजमांडकर, विशालजारवाल (छ.सं.नगर), सक्षमपवार (सातारा), आदित्य चव्हाण (नांदेड), संस्कार संकपाळ (सांगली), उदयरेटवडे (पुणे) तर 19 वर्षे मुलीच्या संघात – दुर्वा भोंगळे (पुणे), रत्नमाला चौर (बीड), संस्कृती कुंभार (सांगली), अक्षदा महाजन (जळगांव), पंकजा चौर (बीड), सानिका नलवडे (पुणे), मानसी पाटील (जळगांव), स्मृती सांगळे (पुणे), रोहीणी नवटक्के (लातूर), अनिशा देवकर (पुणे), अमृता शिंदे (जालना), अनुष्का पुल्लरवार (नागपूर), श्रृध्दा गावडे (पुणे), श्रध्दा कांबळे (पुणे), तन्वी फलफले (पुणे), राणी जाधव (नांदेड) या खेळाडूंचा समावेश आहे.

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी या राज्य क्रीडा दिनाचे औचीत्य साधुन राष्ट्रीय शालेय बेसबॉल (19 वर्षेमुले-मुली) क्रीडास्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 14 ते 18 जानेवारी,2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज व सायन्स कॉलेज, नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारत देशातील विविध राज्यातून जवळपास 700 ते 750 खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आयोजन समिती, राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा अभिजीत राऊत यांचे अध्यक्षतेखाली विविध समिती गठीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्पर्धा आयोजन- नियोजन समिती, खेळाडू स्वागत समिती, निवास व भोजन समिती, मैदान, तांत्रीक, वाहतूक, वैद्यकीय सेवा, पोलीस बंदोबस्त, स्थानिक पर्यटन, सांस्कृतीक कार्य समिती, स्वच्छता व इतर समिती गठीत करण्यात आली असून स्पर्धेची जय्यत तयारी पुर्ण झालेली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेचा उदघाटन 15 जानेवारी,2025 रोजी सकाळी 10 वा. पिपल्स कॉलेज नांदेड येथे बाबा बलविंदरसिंघजी, व राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचे हस्ते होणार आहे. ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र व नांदेडकरांसाठी एक मेजवानीच राहणार आहे. तरी या स्पर्धेकरीता जिल्हयातील जास्तीत-जास्त खेळाडू व क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!