नांदेड(प्रतिनिधी)-सहा वर्षापासून गायब असलेल्या एका 23 वर्षीय युवकाला शोधण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष नांदेड यांना यश आले आहे.
दि.14 मे 2018 रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 138/2018 दाखल झाला होता. त्याची तक्रार मुलांच्या निरिक्षण गृहातील प्रभारी अधिक्षक एस.जे.हिवराळे यांनी दिली होती. त्यात छत्रपती चौकात असलेल्या बालगृहातून 17 वर्षीय मुलगा गायब झाला होता. पण या बाबतचा शोध लागत नव्हता. याचा शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतुक कक्ष येथील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुधीर खोडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईला जाऊन पोलीस ठाणे विठ्ठलवाडी, ठाणे शहर येथे माहिती घेतली असता तो त्या वेळेसचा बालक अंकुश गणेश गव्हाणे (23) रा.तरेचाळ, भक्तीपिठ, आशाळे गाव उल्हासनगर जिल्हा ठाणे येथील होता. त्याला गुन्हा क्रमांक 138/2018 च्या कायदेशीर प्रक्रियेसाठी नांदेडला आणण्यात आले आहे.