२०२५ मधील नांदेड जिल्ह्याच्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

 

नांदेड  :-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना असलेल्या अधिकारान्वये सन 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्या आहेत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये १७ जानेवारी, १ सप्टेंबर, १८ डिसेंबर या तीन तारखांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये १७ जानेवारीला हसरत हाजी सैयाह सखरे मगदूम बडी दर्गाह कंधार ऊर्स, १ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन तर १८ डिसेंबरला श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा निमित्त सुटी जाहीर करण्यात आल्या आहे.

केंद्र शासनाची कार्यालय, न्यायालय व बँक वगळता राज्य शासनाच्या सर्व कार्यालयाला, स्थानिक स्वराज्य संस्थांना, शाळा महाविद्यालयांना, या तीन सुट्ट्या लागू असतील,असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!