नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपाळचावडी येथे एक महिला आणि एक पुरूष अशा दोघांनी एका व्यक्तीच्या बॅगमधील 3 लाख 75 हजार रुपये चोरले आहेत. तसेच पोखर भोसी ता.लोहा येथे एका अर्धवट बांधकाम केलेल्या खोलीत ठेवलेला 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. भोकर शहरात एका महिलेचे गंठण 70 हजार रुपये किंमतीचे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.
विष्णुदास प्रकाश फाटेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जानेवारीच्या सकाळी 6 वाजता गोपाळचावडी येथे त्यांच्या घरात त्यांची पत्नी मनिषा विष्णुदास फाटेकर आणि महेश या दोघांनी त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेले 5 तोळे सोन्याचे दागिणे 3 लाख 75 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 22/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
पोखर भोसी ता.लोहा येथील गोविंद व्यंकटराव भावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोखर भोसी येथे ते राहत असलेल्या घरालगत बांधकाम अर्धवट स्वरुपात असलेल्या खोलीमध्ये त्यांनी लोखंडी पत्राच्या पेटीत 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या रोख रक्कम 50 हजार रुपये असा 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज कोणी तरी 4 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतरच्या 3 वाजेदरम्यान चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 4/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक बगाटे अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथील जेठीबा वर्षेवारनगरात रेखा सुधाकर पवार या 50 वर्षीय महिला 6 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता आपल्या जाऊबाई सोबत पायी जात असतांना त्यांच्या पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण 70 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले आहे. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 9/2025 नुसार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक औटे अधिक तपास करीत आहेत.