नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात आज पहाटे आम्ही प्राप्त केलेल्या तिन छायाचित्रानुसार तेथे टाकण्यात आलेली वाळू ही रात्रीच आणून टाकलेली आहे किंवा पहाटे-पहाटे टाकलेली आहे. कारण एका वाळूच्या ढिकाऱ्यातून पाण्याचा निचरा होतांना दिसत आहे. कोण आहे जबाबदार या वाळूचा किंवा या वाळूची रॉयल्टी भरलेली आहे काय? याचा शोध कोण घेईल.
आम्ही प्राप्त केलेल्या एका छायाचित्रातील वाळू परिमलनगर रोड, पुष्पानगर असे लोकेशन दाखवते आहे. दुसऱ्या छायाचित्रातील लोकेशन डॉ.काब्दे हॉस्पीटल रस्ता वाडीया फॅक्टरी असा दाखवत आहे. तिसऱ्या छायाचित्रातील लोकेशन गणेशनगर रस्ता असे दाखवत आहे.
ही वाळू तेथे टाकलेली आहे. म्हणजे त्याच्या रॉयल्टीची विचारणा करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही काय? महसुल कायद्याप्रमाणे सुर्यास्त ते सुर्योदय या वेळेत वाळुची वाहतुकच करता येत नाही. मग ती वाळु कोणत्या रस्त्याने आली याचा शोध कोण घेईल. घरासमोर जरी वाळू असली तरी ती वाळू कायदेशीर फिस भरून आपल्या दारात आली पाहिजे याची जबाबदारी प्रत्येक नागरीकाची सुध्दा आहे. काही विभाग आमचा रेतीशी काही संबंध नाही असे म्हणतात. महसुल विभागाची ही सर्व जबाबदारी असा अंगुली निर्देशपण करतात. असो तो त्या दोन विभागांमधील समन्वयाचा प्रश्न आहे. पण शासनाचा महसुल यामुळे बुडतो आहे हे नक्कीच.