राज्यात 9 आयपीएस अधिकाऱ्यांना निवड श्रेणी

नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहविभागाने भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणी या पदावर राज्यातील 9 आयपीएस अधिकाऱ्यांना बदली दिली आहे. त्यात नांदेड येथील योगेशकुमार यांचा सुध्दा समावेश आहे.

गृहविभागाचे अवर सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशात सन 2012 या तुकडीतील 9 आयपीएस अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून निवड श्रेणी अशी पदोन्नती दिली आहे.

निवड श्रेणी आलेले आयपीएस अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. राकेश ओला-पोलीस अधिक्षक अहमदनगर, कृष्णकांत उपाध्याय-पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई, प्रविण मुंडे- पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई, तेजस्वी बाळासाहेब सातपुते-पोलीस अधिक्षक शस्त्र निरिक्षक शाखा पुणे, एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी-पोलीस अधिक्षक जळगाव, योगेशकुमार-पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण नांदेड, डी.ए.गेडाम-पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई, राजा आर.-पोलीस अधिक्षक पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, एन.टी.ठाकूर-प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज-दौंड जि.पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!