नांदेड(प्रतिनिधी)-मुख्यमंत्री सचिवालयाने 2 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्र्यांच्या दौरा वेळेत कोणीही अधिकारी पुष्पगुच्छ आणणार नाही आणि पोलीस विभागाच्यावतीने दिली जाणारी मानवंदना बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेले पत्र सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त आणि सर्व पोलीस अधिक्षक यांच्यासह सर्व महानगरपालिका आयुक्त आणि सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना अग्रेशित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री यांच्या त्या-त्या जिल्ह्यातील दौऱ्याच्यावेळेस कोणतेही अधिकारी पुष्पगुच्छ आणार नाहीत तसेच पोलीस दलाकडून देण्यात येणाऱ्या मानवंदनेची प्रथा त्यांच्या दौऱ्यात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही सुचनांचे तंतोतंत पालन व्हावे असे या पत्रात लिहिले आहे.