नांदेड(प्रतिनिधी)-जुलै 2024 मध्ये खून झालेल्या युवकाचा फोटो छापून त्यावर मीस यु भाऊ असे लिहिलेल्या बॅनरला काढून नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका 26 वर्षीय युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
दि.1 जानेवारी 2025 रोजी ढवळे कॉनर सिडको येथील एमएससीबीच्या खांबावर एक पोस्टर लावलेले होते. त्यात शेख शहबाज भाऊ या युवकाचा फोटो लावलेला होता. त्याची जन्म तारीख 1 जानेवारी 2001 अशी लिहिलेली होती. पण दुर्देवाने जुलै 2024 मध्ये या युवकाचा खून झाला होता आणि त्याची आठवण म्हणून हे पोस्टर लावण्यात आले होते. पण पोस्टर लागलेल्या युवकाबद्दल त्यावर लिहिलेले शब्द इतरांना किंबहुना त्याचा खून करणाऱ्यांना तंबी देणारे होते. अर्थात ते आक्षेपार्हच होते. तेंव्हा पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी या बाबत महानगरपालिकेकडे माहिती घेतली तेंव्हा त्याची परवानगी पण नव्हती.
पोलीस उपनिरिक्षक बाबुराव एकनाथराव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्या शेख आदील शेख शकील (26) रा.रहिमपुर दुधडेअरी याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 2/2025 दाखल केला आहे. यात महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंधक अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम जोडण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार मारोती माने यांच्याकडे देण्यात आला आहे.