नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील 26 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच 26 पोलीस नाईक पदाच्या पोलीसांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी या 52 पोलीसांना तात्पुर्ती पदोन्नती देवून भविष्यातील कामासाठी पोलीस विभागाचे नाव उजळ ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सेवा ज्येष्ठतेनुसार नांदेड जिल्ह्यातील पोलीस हवालदार गणपत कोंडजी पेदे, संदीप वसंतराव देगलूरकर(नायगाव), उत्तम माणिकराव निरडे, दिगंबर घनशाम शाहपुरे, देविदास सोनबाजी बसवंते, मोहम्मद गौस गुलाम जिलानी, बालासाहेब सदाशिव पांपटवार, अशोक शामराव केंद्रे, गौतम भुजंगा वाघमारे(पोलीस मुख्यालय), गुंडेराव रघुनाथ करले (लिंबगाव), शेख रसुल शेख महेबुबसाब(एसीबी), सुनिल गंगाधरराव मंचलवाड(भोकर), अप्पाराव बाबाराव राठोड(किनवट), दशरथ खंडेराव जांभळीकर(रामतिर्थ), गणेश धोंडीबाराव कानगुलकर(जीपीयु), विठ्ठल श्रीमंतराव खोमणे, प्रदीप रामचंद्र शेंबाळे(जिविशा), माधव विठ्ठलराव गवळी, संतोष गंगाधर तिडके(नांदेड ग्रामीण), शंकर गोरबा जाधव, नामदेव तुकाराम पोटे(हिमायतनगर), सुधाकर किशनराव पवार, सदाशिव दत्तात्रय आकुलवार(धर्माबाद), अनिल एकनाथराव कुऱ्हाडे(पीसीआर), हनमंत नामदेवराव बोंबले (माळाकोळी), संजय शिवाजीराव भद्रे(शहर वाहतुक शाखा) यांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती प्राप्त पोलीस शिपाई/ पोलीस नाईक ज्यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती मिळाली आहे ते पुढील प्रमाणे आहेत. विजय श्रीराम गलांडे, बालाप्रसाद मोतीराम बेंडे, गणेश चंद्रकांत लोसरवार, अनिल नारायण पारधे (पोलीस मुख्यालय), साईनाथ व्यंकटराव येमेकर(मरखेल), सविता बापुराव जाधव(लिंबगाव), गजानन उत्तमराव डवरे(मसुप अर्धापुर), प्रकाश लक्ष्मण मामुलवार(एसीबी), जमील सईद बेग, अनिल गणेश मोरताडकर(श्वान पथक), हबीब जाबर चाऊस, लक्ष्मण गंगाधर दासरवाड, शिवानंद बालाजी हंबर्डे(इतवारा), संजीव पिराजी जिंकलवाड(स्थागुशा), सय्यद शुजाउद्दीन सय्यद अफरोद्दीन(मुक्रामाबाद), बालाजी वसंत राठोड(उस्माननगर), ज्योती गणपत गायकवाड(शहर वाहतुक शाखा), सतविंदरसिंघ अर्जुनसिंघ मुनीम(बीडीडीएस), प्रशांत पांडूरंग कांबळे(मोटर परिवहन विभाग), पद्मीनी पुंडलिकराव जाधव (नांदेड ग्रामीण), विनोदकुमार गणपतराव पवार(शहर वाहतुक शाखा), सिध्दार्थ किशनराव वाघमारे(सोनखेड), आशा दिगंबर गिरी(महिला सहाय्यक कक्ष), राहुल नारायण कांबळे(वजिराबाद), नारायण संभाजी माठे(तामसा), अविनाश शामसुंदर कुलकर्णी (हिमायतनगर).