नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील रेल्वे रुळांंच्या पलिकडे असलेल्या भागात 56 मटका जुगाराच्या बुक्या बंद झाल्या होत्या. त्याचे श्रेय पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना जाते. पण आता हळूहळू 36 मटका बुक्या सुरू झाल्या आहेत. कोणाच्या जोरावर, कोणाच्या आशिर्वादाने या बुक्या सुरू आहेत. याचा शोध कोण घ्यावा.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरिक्षक पदावर शहाजी उमाप यांना शासनाने पाठविल्यानंतर बऱ्याच महिन्यांमध्ये त्यांनी अवैध धंद्यावर आणलेला आसुड हा कडकच होत गेला. त्यामुळे बऱ्याच मटका बहादरांनी काही दिवस गप्प बसायचे ठरविले. त्यामुळे त्या भागातील 56 मटका बुक्या बंद झाल्या होत्या. पण कोणत्याही प्रकारचा माफीया काही दिवसच गप्प बसू शकतो. कारण त्या व्यवसायातून येणारे उत्पन्न हे एवढे जास्त असते की, ते बंद झाले तर त्या माफीयाला येणाऱ्या अडचणी भरपूर असतात. मटका बुक्यांवर काम करणाऱ्या लोकांना 6 महिने पगार फुकट द्यावा लागतो. नाहीतर ती माणसे परत मिळत नाहीत आणि म्हणून हा सहा महिन्याचा भुर्दंड ते सहन करतात.
जसे-जसे दिवस जातात. तशी तशी जखम भरते. असा वाकप्रचार प्रसिध्द आहे. याचप्रमाणे बंद झालेल्या 46 बुक्यांपैकी आजच्या परिस्थितीत जवळपास 36 मटका बुक्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. या 36 बुक्यांचा कारभार महाकालचे भक्त असणाऱ्या एका स्वामीकडे आहे. महाकालच्या भक्तांना सुध्दा सर्व काही करण्याचे अधिकार प्राप्त आहेत. हे खऱ्या अर्थाने तपासायचे असेल तर उजैनला जावे आणि तेथील परिस्थिती पाहिली आणि त्याची विचारणा केली तर तेथील माफिया सांगतात हे महाकाल की नगरी है , यहा सब चलता है। पण नांदेडच्या रेल्वे लाईन पलिकडचा भाग हा महाकालची नगरी नाही पण महाकालच्या भक्त असलेल्या स्वामीकडे हा कारभार असल्याने तो चालत आहे. ज्यावर कोणाचे नियंत्रण नाही असे म्हणावे लागेल.